आग्रा- नोटा बंदीमुळे अनेक सामान्य , मध्यमवर्गीय आणि गरिबांना त्रास सहन करावा लागतो आहे , त्यांना मी नमन करतो, पण विश्वासाने सांगतो .. आपण सहन करत असलेल्या या त्रासातून. या निखाऱ्यातून सोने होवून देश बाहेर निघेल असे भावनिक आवाहन आज आग्रा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आग्रा येथे प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्धघाटन झाले. यावेळी लाभार्थींना प्रतप्रधानांनी प्रमाणपत्र दिले. रविवारी सकाळी कानपूर जवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. रेल्वे अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अजूनही बचाव कार्य सुरू आहे. केंद्र सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नोटाबंदीमुळे त्रास होत असला तुमचा त्याग व्यर्थ जाणार नाही याची मी खात्री देतो, असे त्यांनी या वेळी म्हटले.पहा आणि ऐका नेमके पंतप्रधान काय म्हणाले ……