सकारात्मक प्रतिमा निर्मितीसाठी जनसंपर्क महत्वाचा :प्रशांत पाठराबे
पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडिया ‘ च्या परिसंवादाला चांगला प्रतिसाद
पुणे :
‘ सरकारी कामापासून सार्वजनिक क्षेत्रातील उद्दिष्टाच्या यशासाठी सकारात्मक प्रतिमा निर्माण होणे गरजेचे असून त्यासाठी संवाद आणि जनसंपर्क उपयोगात आणावा ‘ असा सल्ला प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (पीआयबी ) चे संचालक प्रशांत पाठराबे यांनी आज दिला
‘सार्वजनिक जीवनातील संवाद आणि जनसंपर्काचे महत्व ‘ या विषयावरील परिसंवादात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते . ‘ पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया ‘ ने या परिसंवादाचे आयोजन बुधवारी दुपारी पुण्यातील वैकुंठ भाई मेहता सहकार प्रशिक्षण राष्ट्रीय संस्थेत केले होते .
या परिसंवादात प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (पीआयबी ) चे संचालक प्रशांत पाठराबे ,’ पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया ‘ चे राष्ट्रीय सहसचिव अविनाश गवई , वैकुंठ भाई मेहता सहकार प्रशिक्षण राष्ट्रीय संस्थेचे संचालक प्रा . संजीव पट्जोशी ,बिझनेस standard चे व्यवस्थापक (विपणन ) सुमेध गुप्ते ,’ यंग कम्म्युनिकेटर्स क्लब ‘ चे अध्यक्ष रिदम वाघोलीकर सहभागी झाले होते
प्रशांत पाठराबे म्हणाले ,’ प्रभावी संवादासाठी सर्वाना कळणारे सोपे शब्द वापरले पाहिजेत . शहरापेक्षा ग्रामीण भागात संवाद साधणे आणि जनसंपर्क प्रस्थापित करणे कठीण असते आणि तेथे जनसंपर्क सल्लागार उपलब्ध होतीलच असे नाही ,अशा वेळी स्वतःच संवाद आणि जनसंपर्क वाढविणे आवश्यक असते . सरकारी कामापासून सार्वजनिक क्षेत्रातील उद्दिष्टाच्या यशासाठी सकारात्मक प्रतिमा निर्माण होणे गरजेचे असून त्यासाठी संवाद आणि जनसंपर्क उपयोगात आणावा . जनसंपर्क क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींना भेटण्याची आवड असली पाहिजे
प्रा . संजीव पटजोशी म्हणाले ,’आपल्याला जी भाषा येते ,त्याच भाषेत प्रभावीपणे व्यक्त झाले पाहिजे ,इंग्रजी भाषेचा न्यूनगंड बाळगता कामा नये . यशस्वी होण्यासाठी ऐकण्याची कलाही महत्वाची आहे . ‘ एसेमेस द्वारे संवाद साधताना भाषेची मोडतोड होत असल्याची चिंता व्यक्त करून पट्जोशी यांनी डिक्शनरी वापरण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला
सुमेध गुप्ते म्हणाले ,’प्रत्येक ठिकाणी चांगल्या कामासाठी चांगला संवाद उपयोगी पडतो . सध्याच्या काळात अनेक कंपन्या आक्रमक जाहिराती करून लक्ष वेधत असल्या तरी आपण वयक्तिक पातळीवर चांगल्या संवादावरच भर दिला पाहिजे . संवादातील सातत्य आपल्याला यश मिळवून देते ‘
अविनाश गवई यांनी प्रास्ताविक केले .
संस्थेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .