कोरोना रुग्णांसाठी दोन खाटांच्या तंबुंचा पुरवठा

Date:

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2020-ओएफबी अर्थात आयुध निर्माण मंडळाच्या वतीने कोविड-19 महामारीच्या विरोधात लढा देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावण्यात येत आहे. या आठवड्यात आयुध निर्माण मंडळाने कोरोनाशी लढा देण्यासाठी केलेल्या मदतीची माहिती पुढील प्रमाणे आहे.

दोन खाटांचे तंबू

कोरोनाग्रस्ताला सर्वांपासून वेगळे ठेवण्यासाठी वैद्यकीय उपकरणांनी सज्ज अशा दोन खाटांच्या तंबूंचा पुरवठा ओएफबीच्या वतीने करण्यात आला आहे. या वैद्यकीय तंबूंमध्ये वैद्यकीय आणीबाणी परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णाची तपासणी, इतर आवश्यक असणारे उपचार करणे, त्यासाठी वैद्यकीय उपकरणे जोडणे यांची सुविधा आहे. हे तंबू 9.55 चैरस मीटरचे असून वॉटरफ्रूफ कापडापासून बनवले आहेत. त्यासाठी कमी वजनाचे परंतु मजबूत लोखंड आणि अॅल्यूमिनियम सळया वापरल्या आहेत.

या तंबूंची उभारणी देशात कोणत्याही भू-प्रदेशात करता येवू शकते. ज्याठिकाणी पारंपरिक रुग्णालयांची सुविधा अपुरी पडत असेल त्याठिकाणी अगदी कमी अवधीमध्ये हे तंबू उभारून रुग्णांवर उपचार सुरू करता येतात. कानपूरच्या आयुध उपकरणे निर्माण संस्थेने हे तंबू तयार केले आहेत. असे पन्नास तंबू अरुणाचल प्रदेश सरकारकडे पाठवण्यात आले आहेत.

हात निर्जंतूक करण्यासाठी रसायने आणि चेह-यावर बांधण्यासाठी मास्क

आयुध निर्माण मंडळाच्या देहराडून इथल्या ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स फॅक्टरीच्या वतीने उत्तराखंडच्या राज्यपालांकडे दि. 6 एप्रिल, 2020 रोजी हात  निर्जंतूक करण्यासाठी असलेल्या प्रत्येकी 100 मि.ली.च्या 2,500 बाटल्या दिल्या आहेत. तर चेह-यावर बांधण्यासाठी  1,000 मास्क दिले आहेत.

तामिळनाडूतल्या अरूवनकडू इथल्या कोर्डाईट फॅक्टरीच्या वतीने 10 एप्रिल रोजी नीलगिरी जिल्हा पोलिस अधिका-यांना 100 लीटर्स सॅनिटायझर्स दिले आहे.

पुण्यातील एचईएफ म्हणजेच हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरीच्या वतीने 9 एप्रिल 2020 रोजी एचएलएल बेळगावी यांना पहिल्या टप्प्यात 2,500 लीटर सॅनिटायझर्स पाठवण्यात आले.

रासायनिक द्रव्यांचा धूर कक्ष

नागपूरच्या अंबाझरी इथल्या आयुध कारखान्याच्यावतीने स्वच्छता करण्यासाठी रासायनिक द्रव्यांचा धूर करण्याचे कक्ष विकसित केले आहेत. हे कक्ष एका स्थानावरून दुसरीकडे अगदी सहजपणे नेता येवू शकतात. असा कक्ष अंबाझरी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशव्दारावर उभारण्यात आला आहे.

हात धुण्यासाठी यंत्रणा

देहराडूनच्या आयुध निर्माण कारखान्याने दि. 7 एप्रिल,2020रोजी स्वेदशी बनावटीचे पायाने चालवता येणारी हात धुण्यासाठी यंत्रणा पोलिसांना दिली. या यंत्रणेमध्ये साबणही ठेवण्यात आले आहे.

पुण्याच्या देहूरोड इथल्या आयुध निर्माण कारखान्याने देहूगावातल्या कामगारांना दि. 6 एप्रिल, 2020 रोजी अन्नाच्या पाकिटांचे वितरण केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका.. रोहित पवार आक्रमक

VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे बारामती - मी...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...