पुणे:
लष्कर शांतता कमिटी तर्फे लष्कर पो.ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे)वैशाली चांदगुड़े मॅड़म यांचा बदली निमित्त निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी त्यांचा शाल,पुष्पगुच्छ,पुस्तके व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी लष्करचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुवर,नगरसेवक दिलीपभाऊ गिरमकर ,शांतता कमिटी सदस्य विकास भांबुरे,संदीप भोसले,विजय भोसले,दिलीप भिकुले,संकेत देशपांडे,अक्रम शेख,अशोक,देशमुख,विशाल ओव्हाळ,महेंद्र कांबळे,अतिश कु-हाड़े,नितीन अड़सुळे,सौरभ परदेशी,अयुब खान,आनंद चौधरी,सचिन कांबळे,संजय गायकवाड,मोहन नारायणे आदी मान्यवर उपस्थित होते.
सौ.चांदगुड़े मॅडम यांनी अल्पावधीतच लष्कर भागातील कायदा व सुव्यवस्था राखत सर्वांशी सलोख्याचे संबंध निर्माण केले. कार्यकर्त्यांना सहकार्य करून त्या सामाजिक उपक्रमातही आवर्जुन सहभागी झाल्या.त्यांचा कार्यकाल कायमच आमच्या स्मरणात राहील असे मत विकास भांबुरे यांनी यावेळी व्यक्त केले व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छाही दिल्या.
“सर्व धर्मीय नागरिक,शांतता कमिटी सदस्य व पोलीस सहकारी यांच्यामुळेच चांगले काम लष्कर भागात करता आले”असे मनोगत सौ.चांदगुड़े यांनी व्यक्त केले व सर्वांचे आभारही मानले.

