Pi ग्रीन इनोव्हेशन्सला त्यांच्या कार्बन- कटरसाठी – डिझेल जनरेटर्ससाठीचे रेट्रोफिट टाइप अप्रुव्हल सर्टिफिकेशन प्राप्त

Date:

–    रेट्रोफिट एमिशन कंट्रोल डिव्हाइससाठी (आरईसीडी) क्लास 1 सर्टिफिकेशन मिळणारी पहिलीच कंपनी

पुणे- – Piग्रीन इनोव्हेशन्स प्रा. लि. या भारतातील आघाडीच्या क्लीनटेक स्टार्ट अप कंपनीला सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्डाकडून (सीपीसीबी) त्यांच्या कार्बन कटर मशिन – रेट्रोफिट एमिशन कंट्रोल डिव्हाइससाठी (आरईसीडी) टाइप अप्रुव्हल सर्टिफिकेशन मिळाले आहे. माननीय राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) २०१९ मध्ये डीजी सेट्समधून विशिष्ट मॅटर त्याच्या तेव्हाच्या पातळीवरून ७० टक्क्यांनी कमी करण्याचा आदेश काढला होता. त्यावर आधारित सीपीसीबीने ८००केडब्ल्यू विभागापेक्षा कमी क्षमतेच्या डीजी सेट्ससाठी आपले मापदंड आणि नियमांत सुधारणा केल्या. पीआय ग्रीन इनोव्हेशन्सतर्फे प्रमाणित आरईसीडी हे अशाप्रकारचे महत्त्वाकांक्षी ध्येय साध्य करण्याच्या दिशेने उचललेले मोठे पाऊल आहे. या प्रमाणपत्रामुळे पीआय ग्रीनच्या कार्बन कटर तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण झाले असून कंपनीला या क्षेत्रात स्वतंत्र स्थान तयार करणे शक्य होणार आहे.

भारतात ५० पैकी ३५ शहरांत अतिशय खराब हवा असून २०२१ मध्ये दिल्ली जगातील सर्वात प्रदुषित राजधानी असल्याचे आयक्यू एयर या स्विस संस्थेने तयार केलेल्या वर्ल्ड एयर क्वालिटी अहवालात सलग चौथ्या वर्षी नमूद करण्यात आले आहे. २०१८ मध्ये लाँच करण्यात आलेला नॅशनल क्लीन एयर प्रोग्रॅम (एनसीएपी) हवा प्रदुषणाच्या वाढत्या समस्येशी लढण्यासाठी तयार करण्यात आला होता. त्याशिवाय डिझेल जनरेटर्स सेट्सद्वारे तयार होणाऱ्या प्रदुषणाची समस्या तातडीने हाताळण्याची गरज निर्माण झाल्याचे लक्षात आले होते.

सीपीसीबीने जारी केलेली सर्टिफिकेशन यंत्रणा व प्रक्रिया सर्वसमावेशक आणि आधुनिक डायग्नॉस्टिक्सच्या सर्व गरजा व ऑपरेटर वॉर्निंग सिस्टीम पूर्णपणे समाविष्ट करणारी व पर्यायाने इन्स्टॉल केलेल्या डीजी सेट्समधून घातक पीएम २.५ आणि पीएम १० उत्सर्जन कमी करण्यासाठी आरईसीडी फिट व प्रभावी असल्याचा निर्वाळा देणारी आहे. सीपीसीबी चाचणीचे निकष आणि आरईसीडीची कामगिरी उदा. जुन्या जुन्या आरईसीडीच्या बॅक प्रेशरमुळे मान्यताप्राप्त आरईसीडीचा डीजी सेट्सच्या त्याच्या कार्यकाळात कामावर कोणताही चुकीचा परिणाम होणार नाही याची खात्री करण्यात आली. पीआय ग्रीन इनोव्हेशनचे आरईसीडी उत्पादन – कार्बन कटरला टाइप १’ सर्टिफिकेशन देण्यात आले आहे, ज्यातून त्याचा टाइप-२ आरईसीडीसारख्या त्याने एनओ२ सारखे दुय्यम उत्सर्जन वाढवणाऱ्या उत्पादनांच्या तुलनेत दर्जा अधिक चांगला असल्याचे प्रमाणित होते.

याविषयी पीआय ग्रीन इनोव्हेशन्सचे सह- संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. इरफान पठाण म्हणाले, ‘पीआय ग्रीन इनोव्हेशन्समध्ये आम्ही कायमच स्वच्छ हवेचं ध्येय साध्य करण्यासाठी वचनबद्ध असतो आणि सीपीसीबी मान्यताप्राप्त लॅबकडून मिळालेल्या सर्टिफिकेशनने या ध्येयाप्रती आमची बांधिलकी अधिक मजबूत झाली आहे. कार्बन कटर तंत्रज्ञानावर आमचा दृढ विश्वास असून ती कठोर निकषांवर चोख उतरल्याचा आम्हाला आनंद झाला आहे. त्याशिवाय आमचे ओईएम भागीदार त्यांच्या ग्राहकांना मान्यताप्राप्त आरईसीडी पलब्ध करून देण्यास उत्सुक आहेत. एनसीएपीच्या अमलबजावणीतून भारतात स्वच्छ हवेचे ध्येय आणखी पुढे नेण्यासाठी मोठा हातभार लागेल असा आमचा विश्वास असून या महत्त्वाच्या कामासाठी योगदाना देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

पीआय ग्रीन इनोव्हेशन्सकडे भारत, अमेरिका, चीन, युके, युरोपियन युनियन आणि सिंगापूरमध्ये आपल्या उत्पादनासाठी पेटंट आहे. २०१६ मध्ये १५० चौरस फुटांच्या वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या पाच सदस्यांसह कंपनीची स्थापना करण्यात आली होती व आज तिचे पुण्यातील ५५ हजार चौरस फुटांच्या जागेत कार्यरत असेलल्या १०० लोकांच्या टीममध्ये रुपांतर झाले आहे. आज पीआय ग्रीन हवा प्रदूषणावर आधारित चर्चा घडवून आणण्यात आघाडीवर आहे तसेच विविध सरकारी राज्ये व राज्य प्रदूषण कंट्रोल बोर्डासह एकत्रितपणे देशांतर्गत प्रदुषणाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक धोरणावर काम करते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...