एक्साईज ड्युटी आणि व्हॅट कपात केल्याने ,महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त

Date:

पुणे-महाराष्ट्रात पेट्रोल प्रतिलिटर पाच आणि डिझेल प्रतिलिटर अडीच रुपयांनी स्वस्त झालं आहे. केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडून कर कपातीची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं आहे. नवे दर तात्काळ लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून पेट्रोलचे दर कमी करण्यात आल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारने पेट्रोलमध्ये अडीच रुपयांची कपात केली असून, डिझेलच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे डिझेल प्रतिलिटर फक्त अडीच रुपयांनी स्वस्त झालं आहे. व्हॅट राज्य सरकारांनीकमी करावे या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रासह गुजरात आणि युपी मध्ये व्हॅट कमी करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीत अडीच रुपयांची कपात केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांची कपात केली. यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल प्रतिलिटर पाच रुपये आणि डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त झालं आहे.

केंद्राने जसा अडीच रुपयाचा दिलासा दिला तसाच दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अडीच रुपयांची कपात करावी असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं होतं. त्याला महाराष्ट्र सरकारने प्रतिसाद दिला असून नवे दर तात्काळ लागू करत असल्याची घोषणा केली आहे.

याआधी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इंधनावरील एक्साइज ड्युटी केंद्र सरकारकडून १ रुपया ५० पैसे कमी करण्यात आली आहे, तर ओएमसी अर्थात तेल कंपन्यांकडून १ रुपया कपात केली जाणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना पेट्रोल प्रतिलिटर अडीच रुपयांनी स्वस्त मिळणार, अशी माहिती दिली. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आम्ही आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी करतो आहोत असेही जेटली यांनी स्पष्ट केले.

केंद्राने जसा अडीच रुपयाचा दिलासा दिला तसाच दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अडीच रुपयांची कपात करावी. म्हणजेच पेट्रोलवरचा व्हॅट राज्य सरकारांनी कमी आकारावा म्हणजे ग्राहकांना प्रतिलिटरमागे पाच रुपयांचा दिलासा त्वरित मिळेल. यासंदर्भात आम्ही देशातील सगळ्या राज्यांशी चर्चा करणार आहोत त्यांनी त्वरित यासंदर्भात घोषणा करावी असे आवाहन आम्ही करणार आहोत. जेणेकरून ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर पाच रुपयांची सूट मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने इंधन दर वाढले आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम...

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...