Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पेट्रोल पंपाहून बँकेत जाणारी २७ लाखाची रोकड पळवून नेणारे पाच जण जेरबंद : २४ लाख हस्तगत

Date:

पुणे : पेट्रोल पंपावर जमा झालेली २७ लाख रुपयांची रोकड बँकेत भरण्यासाठी घेऊन जाणाऱ्यांना हत्याराचा धाक दाखवून लुटणाऱ्या ५ जणांना गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने अटक केली आहे. त्यांच्याकडून २४ लाख १२ हजार १५० रुपये हस्तगत करण्यात आले आहेत़.धनकवडी भागातील शंकर महाराज मठाशेजारी असणाऱ्या पेट्रोलपंपावर काम करणारे बर्नाटदास अँथोनी हे पंपावर जमा झालेली २७ लाख ५९ हजार रुपयांची रोकड घेऊन भवानी पेठेतील बँकेत भरण्यासाठी मोटारीने २६ मार्च २०१८ रोजी निघाले होते़. त्यावेळी दोन तरुणांनी हत्याराचा धाक दाखवून ही रोकड लुबाडून नेली होती़.

आहद अन्वर सैय्यद (वय २२), साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतील बागवान (वय २०), तौसिफ ऊर्फ मोसीन जमीर सैय्यद (वय२३), जमीर अहमद हुसेन सैय्य (वय ५९, चौघेही रा़ संतोषनगर, कात्रज) आणि सुरज ऊर्फ मोटा ऊर्फ दस्तगीर शमशुद्दीन यालगी (वय १९, रा़. टिळेनगर, कोंढवा रोड, कात्रज) अशी त्यांची नावे आहेत़.
अप्पर पोलीस आयुत्क प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम मोरे यांनी माहिती दिली़. धनकवडी भागातील शंकर महाराज मठाशेजारी असणाऱ्या पेट्रोलपंपावर काम करणारे बर्नाटदास अँथोनी हे पंपावर जमा झालेली २७ लाख ५९ हजार रुपयांची रोकड घेऊन भवानी पेठेतील बँकेत भरण्यासाठी मोटारीने २६ मार्च २०१८ रोजी निघाले होते़. त्यावेळी दोन तरुणांनी हत्याराचा धाक दाखवून ही रोकड लुबाडून नेली होती़.पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज माहितीवरून, गुन्हे शाखेकडून गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. त्यावेळी गुन्हा केल्यानंतर सर्व जण बंगळुरु, हैदराबाद, हुमनाबाद, गुलबर्गा व इतर शहरात पळून जाऊन वास्तव्य करत असल्याचे समोर आले . त्यानंतर पोलिसांनी चेन्नई, गुलबर्गा येथे जाऊन अटक केली. या सर्वांना अटक करण्यासाठी पोलिसांनी तब्बल १२ ते १५ हजार किलोमीटरचा प्रवास करून त्यांच्याकडून गुन्ह्यात लुबाडलेली २४ लाख १२ हजार १५० रुपयांची रोकड जप्त केली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शकुर सय्यद, सहायक निरीक्षक रविंद्र बाबर, पोलीस कर्मचारी संदीप राठोड, अतुल साठे, अनिल घाडगे, अशोक भोसले, गुणशिंलन रंगम, रोहीदास लवांडे, राजू रासगे, महेंद्र पवार, गजानन गाणबोटे, अनिल भोसले, शिवानंद स्वामी, आजिनाथ काळे, संदीप तळेकर, कल्पेश बनसोडे, सुजित पवार, संदेश निकाळजे, नागेश माळी, निलेश देसाई यांनी कारवाईत भाग घेतला.
पेट्रोल भरताना सुचला प्लॅन
दस्तगीर यालगी हा ४ महिन्यांपूर्वी पेट्रोल भरण्यासाठी या पेट्रोलपंपावर गेला होता़. त्यावेळी सोमवारी तेथे जास्त प्रमाणात कॅश जमा होत असल्याचे त्याने पाहिले होते़. त्यावरुन त्याला ही रक्कम लुटण्याची कल्पना सुचली़. त्यानंतर त्यांनी यासाठी संपूर्ण ड्रेस नव्याने खरेदी केले़ सिम कार्ड, मोबाईल, हँडसेट खरेदी करुन मोटारसायकल चोरली होती़. त्यानंतर दोन ते तीन सोमवारी त्यांचा हा प्लॅन फसला होता़. साकीब मेहबुब चौधरी याने २६ मार्च ला टेहाळणी करुन पेट्रोलपंपावरील लोक कधी बाहेर पडतात, याची वाट पहात थांबला होता़ ते बाहेर पडताच मोटार आडवी घालून त्यांच्या मोटारीला अडवत पुढे नेले होते़. त्यांची मोटार कोंढवा बिबवेवाडी रोडवर आल्यावर दुचाकीवरील दोघांनी हत्याराचा धाक दाखवत त्यांच्याकडील रोकड घेऊन ते पसार झाले होते़. ते देहुरोडला गेले़. तेथून ते बंगलूर, हुमनाबाद, गुलबर्गा येथे केले़ तौसिफ सैय्यद याला अटक केल्यावर त्याने यातील रोकड हैदराबाद येथे एअर होस्टेस असलेल्या बहिणीकडे व वडील जमीर हुसेन सैय्यद यांच्याकडे दिली असल्याचे सांगितले़. बहिणीने दुसºयाकडे ठेवायला दिलेली रक्कम पोलिसांनी हस्तगत केली़. मुलाला अटक केल्याचे समजताच जमीर सैय्यद हे कुटुंबासह कर्नाटकात पळून गेले होते़. त्यांना चेन्नई जवळ असलेल्या नेल्लोर येथून ताब्यात घेतले व देहुरोड येथे ठेवलेली रक्कम जप्त करण्यात आली़.
तौसिफ सैय्यद याच्याविरुद्ध चार गुन्हे दाखल असून त्याला १३ फेब्रुवारी २०१७ पासून पुणे शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे़ दस्तगीर यालगी याच्याविरुद्ध वाहनचोरीचे २ गुन्हे दाखल आहेत़.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अहमदाबाद विमान अपघातामुळे काँग्रेसचे मतचोरी विरोधातील मशाल मोर्चे १५ जून पर्यंत स्थगित

गडचिरोली/मुंबई दि १२ जून २५नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून...

बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसा निमित्त सदानंद मोरे यांच्या हस्ते सत्कार अन रक्तदान शिबीर संपन्न.

पुणे (दि.१२) -सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने...

जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ

पुणे, दि. १२ : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण...