वेळ उशीरा जाहीर केल्याने लोकांमध्ये नाराजी
पुणे- कोरोना ने गेली वर्षाहून अधिक काल चिंतेत असलेल्याना आता लसीकरणासाठी कोविन अॅॅपने त्रस्त केले आहे. अशा पद्धतीची त्रासदायी नोंदणी सरकारने केल्याने नागरिकात तीव्र भावना व्यक्त होत आहेत
देशात 18 आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांचे लसीकरण एक मेपासून सुरू होणार आहे. यासाठी रजिस्ट्रेशन आजपासून म्हणजेच 28 एप्रिल संध्याकाळी 4 वाजेपासून सुरू होणार होते. मात्र 4 वाजताच कोविन पोर्टल क्रॅश झाले. काही ठिकाणी ते सुरु झाले तेव्हा नोंदणी होऊनही लोकांना वॅॅक्सीन सेंटरच उपलब्ध नसल्याचे पोर्टल वरून दर्शविले जात होते .तर जे उपलब्ध दिसत ते ४५ प्लस साठी असल्याची नोंद दिसत होती . लोकांना आरोग्य सेतु आणि उमंग अॅपवरही अशाच समस्येचा सामना करावा लागला. खरेतर 18 ते 44 वर्षांचे लोक रजिस्ट्रेशन न करता लस घेऊ शकणार नाहीत. दरम्यान आता पोर्टलने लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

यापूर्वी सरकारने रजिस्ट्रेशनसाठी तारीख घोषित केली. मात्र कोणत्या वेळी रजिस्ट्रेशन सुरू होईल? याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. अशा वेळी लोकांनी 27 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपासूनच कोविन पोर्टल, आरोग्य सेतु किंवा उमंग अॅपवर रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रक्रिया सुरू झाली नाही तेव्हा लोक सोशल मीडियावर तक्रारही करताना दिसले. यानंतर सरकारने आरोग्य सेतु अॅपच्या माध्यमातून परिस्थितीची माहिती दिली.
त्यानुसार, ज्या 18+ वयोगटातील लोकांना लस घ्यायची आहे त्यांच्यासाठी नोंदणी बुधवारी संध्याकाळी 4 वाजल्यापासून सुरू होईल. अशा लोकांना केवळ खासगी आणि राज्य सरकारच्या केंद्रांच्या उपलब्धतेच्या आधारे अपॉइंटमेंट मिळेल. म्हणजेच, 1 मे रोजी लसीकरणासाठी तयार असलेल्या केंद्रांच्या आधारेच लोकांना अपॉइंटमेंट दिली जाईल.आरोग्य सेतूच्या ट्विटर हँडलवरून सकाळी 7.50 ते संध्याकाळी 4 या वेळेत नोंदणी जाहीर करण्यात आली. म्हणूनच पहिल्यापासूनच नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की सरकारने पहिलेच वेळ जाहीर करायला हवा होता. 27 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून लोक नोंदणी करण्याचा प्रयत्न करत होते.
रजिस्ट्रेशन कसे होईल?
आरोग्य सेतु अॅप्लिकेशन आणि कोविन वेबसाइट (cowin.gov.in) वर रजिस्ट्रेशन होत आहे. यासाठी तुम्हाला हे करावे लागेल –
- मोबाइल नंबरला OTP ने व्हेरिफाय करावे लागेल.
- आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा कोणत्याही इतर फोटो ओळख पत्राच्या आधारावर आपली माहिती सबमिट करावी लागेल.
- पिनकोड इत्यादी टाकून व्हॅक्सीनेशन साइट, तारीख आणि वेळ निवडावी लागेल.
- एका मोबाइल नंबरवरुन जास्तीत जास्त चार लोकांचे रजिस्ट्रेशन होऊ शकेल.

