साई प्रतिष्ठान आणि शिव राजमुद्रा प्रतिष्ठान उपक्रम
पुणे;
रक्तदानाने गुढी पाडव्याला नव वर्षाचे स्वागत करण्याचा अनोखा उपक्रम साई प्रतिष्ठान आणि शिव राजमुद्रा प्रतिष्ठान(रामनगर ,येरवडा ) यांच्या तर्फे आयोजित करण्यात आला होता . मंदिरात गुढी उभारल्यानंतर रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला . ३४ फूट उंच गुढी उभारण्यात आली . सकाळी नऊ ते सायंकाळी चार यावेळेत हा उपक्रम पार पडला . सर्व वयोगटातील व्यक्तींनी त्यात सहभाग घेतला . एकूण ५४ जणांनी रक्तदान केले .सुरज कदम ,किशोर कांबळे ,महेंद्र चव्हाण यांनी संयोजन केले