पुणे, 3 फेब्रुवारी 2022: लायन्स क्लब ऑफ रहाटणी आणि लिओ क्लब ऑफ रहाटणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लायन्स क्लब ऑफ रहाटणी करंडक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत परंडवाल क्रिकेट अकादमी, चंद्रोज् क्रिकेट अकादमी, 30 यार्डस् क्रिकेट अकादमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.
हजारे मैदान, मोशी येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत आयुष येलवंडेच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर परंडवाल क्रिकेट अकादमी संघाने कॅनन क्रिकेट क्लब संघाचा 8 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना कॅनन क्रिकेट क्लब संघाने 22 षटकात सर्वबाद 104 धावा केल्या. श्लोक घोगरेने 35 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. आयुषने 14 धावात 4 गडी बाद केले. 104 धावांचे लक्ष प्रथमेश वाघमारेच्या नाबाद 48 धावांसह परंडवाल क्रिकेट अकादमी संघाने 17.2 षटकात 2 बाद 107 धावांसह पुर्ण करत स्पर्धेत विजय मिळवला. आयुष येलवंडे सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत चंद्रोज् क्रिकेट अकादमी संघाने एसएनबीपी क्रिकेट अकादमी संघाचा 127 धावांनी दणदणीत पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. पहिल्यांदा खेळताना चंद्रोज् क्रिकेट अकादमी संघाने 25 षटकात 4 बाद 215 धावा धावांचा डोंगर रचला. यात चैतन्य कोंडभरने आपल्या फलंदाजीत सातत्य राखत 68 चेंडूत 17 चौकारांसह नाबाद 119 धावा करून संघाचा डाव बळकट केला. दिप पाटीलने 40 धावा करून चैतन्यला सुरेख साथ दिली. 215 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पार्थ सोनावणेच्या अचूक गोलंदाजीपुढे एसएनबीपी क्रिकेट अकादमी संघ 17.3 षटकात सर्वबाद 88 धावांत गारद झाला. चैतन्य कोंडभर सामनावीर ठरला.
अन्य लढतीत प्रचित भालगटच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर 30 यार्डस् क्रिकेट अकादमी संघाने तिकोने क्रिकेट गुरूकुल संघाचा 23 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरीकॅनन क्रिकेट क्लब- 22 षटकात सर्वबाद 104 धावा(श्लोक घोगरे 35(56, 4×4), कृतार्थ मैद 19(29, 2×4), आयुष येलवंडे 4-14, अथर्व 1-4) पराभूत वि परंडवाल क्रिकेट अकादमी- 17.2 षटकात 2 बाद 107 धावा(प्रथमेश वाघमारे नाबाद 48(53, 8×4), अयुष म्हाळसकर नाबाद 22 (32, 4×4), वर्धन सपकाळ 1-6) सामनावीर- आयुष येलवंडेपरंडवाल क्रिकेट अकादमी संघाने 8 गडी राखून सामना जिंकला.

चंद्रोज् क्रिकेट अकादमी- 25 षटकात 4 बाद 215 धावा(चैतन्य कोंडभर नाबाद 119(68, 17×4), दिप पाटील 40(32, 5×4), निरंजन वाघमारे 1-27, संयोग नांदेडकर 1-27) वि.वि एसएनबीपी क्रिकेट अकादमी- 17.3 षटकात सर्वबाद 88 धावा(ओजस अर्जून 21(33, 1×4), सुर्यवंश प्रतापसिंग 19(28, 3×4), पार्थ सोनावणे 4-15), जय पाटील 1-3, समीक्षा 1-3) सामनावीर- चैतन्य कोंडभरचंद्रोज् क्रिकेट अकादमी संघाने 127 धावांनी सामना जिंकला.30 यार्डस् क्रिकेट अकादमी- 22.5 षटकात सर्वबाद 135 धावा(वैभव मोरे 23(31, 1×4), ओम राणे 23(17, 1×4), साहिल शेख 18(23, 2×4), सोहम वनारे 3-17, व्रिशांक राय 4-28, प्रचित भालगट 2-19) वि.वि तिकोने क्रिकेट गुरूकुल- 25 षटकात 7 बाद 112 धावा(प्रचित भालगट नाबाद 52(47, 7×4), साहिल शेख 2-12, विहान सुतार 2-24, वैभव मोरे 1-7) सामनावीर- प्रचित भालगट30 यार्डस् क्रिकेट अकादमी संघाने 23 धावांनी सामना जिंकला.

