पांडुरंग मरगजे: सुवर्णमहोत्सवी वाटचाल

Date:

एक अत्यंत साधा ,सामान्य दिसणारा असा चेहरा ,व्यक्तिमत्व देखील सामान्य …पण तरीही दक्षिण पुण्यात ज्याने आपल्या वागणुकीने ,आचरणाने अनेकांच्या मनात अढळ स्थान मिळविले अशा पत्रकार पांडुरंग मरगजे यांचा वाढदिवस -पेशाने वकील असलेले पण याभागात सामाजिक कार्यकर्ते म्हणूनच जास्त ओळख मिळविलेले अँड.दिलीप जगताप यांनी या निमित्ताने व्यक्त केलेल्या भावना येथे देत आहोत ……

चिकाटी, मेहनत आणि संघर्ष करण्याची वृत्ती अंगी असणारी व्यक्ती आपल्या बरोबरच इतरांचं हि जगणं समृद्ध करत असते इतकेच नव्हे तर नियोजन पुर्वक आणि निर्धाराने कष्ट केल्यास यश तुमचेच आहे. हा महामंत्र समाजाला देत राहते आणि ओसाड आयुष्यात नंदनवन कसे फुलवायचे याचे एक तेजस्वी उदाहरण होऊन अखंडपणे तेजाळत राहते. खरतर अशा व्यक्ती समाजात दुर्मिळ असतात पांडुरंग मरगजे तथा बाळासाहेब त्यापैकीच एक होत

पांडुरंग मरगजे यांच्या यशस्वीतेच्या झगमगणार्‍या कारकिर्दीच्या झालरी मागे अनेक कडू, गोड प्रसंग, आठवणी, करावा लागलेला संघर्ष, सोसावे लागलेले परिश्रम, आलेले अनुभव, उद्दिष्टपूर्तते साठीचा त्याग,  ध्येयपूर्तीकडे जाणारे समाधान आणि भविष्यातील संकल्पसिद्धी. या सर्व बाबी अंतर्भूत आहेत, समाजजागृती हे आपलं आद्य कर्तव्य आहे, असे समजून पत्रकारिता समर्थपणे चालवित असतानाच  समाजातील विविध क्षेत्रांतील घडणार्‍या घटनांचा वृत्तरूपाने आरसा बनत आहात. ध्येयवाद न सोडता हि यशस्वी होता येतो, हे आपण वयाच्या ५० व्या वर्षात प्रदार्पण करताना दाखवून दिले आहे आणि त्याच मार्गाने गेली ४९ वर्षे आपली वाटचाल सुरू आहे. शिवछत्रपतींच्या पद्स्पर्शाने आणि आई मंडाई देवीच्या आशिर्वादाने पुनीत झालेल्या कान्हवडी सारख्या छोटयाशा गावात १९७० साली आपला जन्म झाला

पांडुरंग मरगजे हे शेतकरी कुटुंबातील एक शांत व सोज्वळ असे मितभाषी व्यक्तीमत्वच. दुर्गम डोंगरी तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या या तालुक्यातील आपल्या गावीच त्यांनी सुरूवातीचे प्राथमिक शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर अतिशय कठीन परिस्थितीत मोठ्या धैर्याने बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतले.

उमेदिच्या काळात आपल्या आयुष्याची सुरुवात सुरू करताना त्यांनी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे रहायचे आपले ध्येय निश्चित केले आणि पुणे विद्यापीठामध्ये लेखनिक म्हणून काही काळ नोकरी देखील केली. केवळ अल्पकाळ असलेल्या या नोकरीचे भरवशावर न रहाता त्यांनी भोर तालुक्यातील अनंत दूध प्रा.लि. मध्ये व्यवस्थापक म्हणून पाच वर्षे नोकरी केली. सततच धडपडणाऱ्या या तरुणाला नेहमीच प्रगतीचे वेगवेगळे मार्ग शोधण्याची सवय होतीच. अंगी चिकाटी प्रामाणिक असल्याने ते पुढच्या काळात विश्वकर्मा विद्यालयामध्ये लेखनिक म्हणून नोकरीस लागले. स्वतःच्या विवाहानंतर आयुष्याची जबाबदारी आणखीनच वाढल्याने त्यांनी हि जबाबदारी देखील प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत व्यवसायात देखील लक्ष घातले आणि प्रसंगी रिक्षाही चालवली. विमा प्रतिनिधी म्हणून काम करताना पतसंस्थेच्या दैनंदिन ठेवी गोळा करीत पांडुरंग मरगजे यांनी धनकवडी परिसरात दांडगा जनसंपर्क निर्माण केला. शिवप्रेरणा नागरी सह. पतसंस्थे च्या स्थापनेत पुढाकार घेत त्यांनी सामाजिक कार्यासाठी देखील नेहमीच आपला बहुमोल वेळ दिलेला आहे. अनंत प्रेरणा प्रतिष्ठानमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या पांडुरंग मरगजे यांनी आपल्या लेखन व वाचनाच्या आवडीला जोड देत मुक्त पत्रकार म्हणूनही काही काळ काम केले. महाराष्ट्र टाईम्स सारख्या नामांकित वृत्तपत्राचे स्थानिक वार्ताहर म्हणून चार वर्षे काम केल्यानंतर आज ते   लोकमतचे पत्रकार म्हणूनही चांगल्या प्रकारे वार्तांकन करत आहे.

धनकवडी उपनगरातील उच्चभ्रू, मध्यमवर्गीय व जाणकारांचा मोठा भरणा असलेल्या  नावाजलेल्या राजमुद्रा सोसायटीचे सचिव म्हणून पांडुरंग मरगजे काम पाहत आहेत.

आपल्या सामाजिक कार्याची वाटचाल सुरु करताना पांडुरंग मरगजे यांनी
स्वतः ला एक आदर्श पती आणि पालक म्हणून देखील सिद्ध करून दाखवले आहे. पत्नी संगीता शिवप्रेरणा नागरी सहकारी पतसंस्थेवर संचालक म्हणून काम पाहात आहे तसेच त्या सोसायटी मधील महिलांसाठी चालविल्या जात असलेल्या राजलक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्षा म्हणून काम पाहात आहेत. पांडुरंग मरगजे यांनी आपल्या दोन्ही मुलांना त्यांच्यातील अंगभूत कला व आवडीनुसार वेळोवेळी व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्यांचा साहिल हा मुलगा आज कला व क्रिडा  क्षेत्रात बालवयातच दमदारपने पाऊले टाकतोय. बालकलाकार साहिल नाट्य, कला व चित्रपट क्षेत्राबरोबर एक खेळाडू म्हणून राष्ट्रीय पातळीवर  चमकू लागला आहे तर दुसरा मुलगा सोहम हा देखील बॉक्सिंगमधील आपली आवड जोपासत आहे. खरंतर या दोन्ही मुलांच्या यशात पत्रकार पांडुरंग मरगजे यांचे देखील खुप कष्ट असून त्यांची अफाट जिद्द योगदानामुळे भविष्यात या दोन्ही मुलांची कारकिर्द खरोखरच बहरणार आहे.
पांडुरंग मरगजे यांनी आपल्या पत्रकारीता व सामाजिक कार्यातून अनेक चांगले उपक्रम हाती घेतले असून समाजाप्रती असलेली स्वतःची आस्था देखील त्यांनी वेळोवेळी दाखवून दिली आहे.. आपल्या प्रामाणिक व निःस्वार्थ स्वभावामुळे त्यांनी लोकांचे मन जिंकले आहे.

पांडुरंग मरगजे तुम्ही आपल्या आजपर्यंतच्या वैयक्तिक आयुष्यात चांगला  मित्रपरिवारही जमा केलेला आहे. तुम्ही  स्वतःच आयुष्य प्रामाणिकपणे जगताना नेहमीच दुसऱ्यांना मदतीसाठी हात देण्याची भूमिका घेतली आहे. इतरांना शक्य ते सहकार्य व साथ देण्याची तुमची हि जिज्ञासू वृत्ती नक्कीच तुम्हांला आपल्या आयुष्यात चांगले सत्कार्य करण्यासाठी बळ देणारी ठरत आहे. पांडुरंग मरगजे तुम्हांला या पुढील काळात देखील असेच चांगले सत्कार्य करण्यासाठी परमेश्वर शक्ती देवो. तुम्हांस व तुमच्या कुटुंबातील सर्वांनाच सतत चांगले दिवस येवोत. सुख, समाधान व आरोग्य तुमच्या घरात कायमच वास्तव्य करो हिच सदिच्छा आणि वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा…!

  • अँड. दिलीप जगताप – अध्यक्ष – जनहित फौंडेशन
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...