पुणे-भारतात पंजाब आणि हरियाणा या राज्यात भाताची लागवड मोठया प्रमाणात होते. भात काढणीनंतर भाताचे
काड जाळले जाते. याने प्रचंड प्रमाणात वायू प्रदूषण होते. तसेच भात काडातील असलेल्या कर्ब् तसेच इतर
मूलद्रव्यांचा ऱ्हास होतो. ह्या मूलद्रव्यांचा उपयुक्त वापर झाल्यास जमिनीची प्रत सुधारण्यास हमखास मदत
होऊ शकते. काड गोळा करून त्याची कुजवन करणे हे प्रात्यक्षिकतेत बसणे अवघड आहे. या समस्येला उपाय
पुणे यथील कॅन बायोसिस प्रा. लि. या कंपनी ने शोधला आहे, ज्यांनी शेतीउपयुक्त जिवाणूंनी समृद्ध असे
“स्पीड कंपोस्ट” नावाचे सेंद्रिय खत तयार केले आहे. हे खत नियंत्रण मंडळ (FCO) मान्यताप्राप्त असून इकोसर्ट
(ECOCERT) प्रमाणित आहे. मागील तीन वर्षांपासून पंजाब आणि हरियाणा येथे १०,००० हेक्टर क्षेत्रावर, त्याच
जमिनीत, १५-२० दिवसात काडाची यशस्वीरीत्या कुजवन करण्यात कॅन बॉयोसिस ला यश मिळाले आहे.
सद्य परिस्थितीत भात काड जाळल्याने उद्भवलेली समस्या व त्यावर कॅन बायोसिस कंपनी च्या या कामाची
दखल घेत टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्ड (TDB), दिल्ली ने दि. 27 मार्च 2018 रोजी कॅन बायोसिस पुणे या
कंपनीशी एक करार केला आहे. या कारान्वये टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्ड, दिल्ली, हे कॅन बायोसिस, पुणे यांना
“इन सिटू अक्सेलरेटेड अँड सस्टेनेबल राईस स्ट्रॉ डिकंपोझीशन” या प्रकल्पाला आर्थिक सहाय्य करतील.
ह्या प्रकल्पान्वये २०१८ वर्षात २५००० हेक्टर , २०१९ वर्षात ५०००० हेक्टर तर २०२० वर्षात १ लाख हेक्टर व
२०२१ या वर्षात २ लाख हेक्टर शेतजमिनीवर भात काडाचे खतात रूपांतर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच
खत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या मातीच्या भौतिक, रासायनिक तसेच जैविक घटक बदलावाचे बारकाईने
विश्लेषण केले जाणार आहे.
या तंत्रज्ञानाचे मुख्य फायदे म्हणजे उपयुक्त सूक्ष्मजीव थेट मातीमध्ये मिसळले जातात, जे काडातील
सेल्युलोज, स्टार्च आणि सिलिका यांचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर करण्यास मदत करतात. या तंत्रज्ञानामध्ये यंत्र
आणि पाणी यांचे किमान वापर यांचा समावेश आहे. हे तंत्रज्ञान भात पीक तसेच इतर पिकात ही काडाचे रूपांतर
खतात करण्यासाठी शेतक-यांना एक आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य पर्याय आहे. विशेषतः जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढून
जमिनीचा सामू नियंत्रण करण्यास मदत मिळेल. तसेच वापर झालेल्या जमिनीची सेंद्रिय तथा रासायनिक
खतांची व पाण्याची ग्रहण क्षमता वाढण्यास मदत मिळणार आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराने तयार झालेल्या
खताचा वापर पुढील पिकास होऊन जमीन सुधारून उत्पन्न वाढण्यास मदत मिळते. तसेच जमिनीचा पोत
सुधारण्यासही मदत मिळते.
जमिनीवरील शेतीकचरा त्याच ठिकाणी कमी वेळेत कुजवण्याने शेतकरी कचऱ्याला जाळणे नक्कीच टाळेल. या
प्रकल्पान्वये मृदा संवर्धन व संपन्नता तर सुधारेलच, याचबरोबर कचरा जाळल्याने वातावरणातील वायू
प्रदूषणही आटोक्यात आणण्यास मदत मिळेल