पुणे -आज पुण्यात ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या जयघोषात .. विठ्ठलनामाच्या गजरात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या आणि लाखो वारकऱ्यांचा मेळा दाखल झाला आणि यांच्या सेवेसाठी शेकडोंनी संस्था संघटना राजकीय कार्यकर्ते पुढे आले . कलाकारांनीही यात पुढाकार घेतला तो फरासखाना विश्रामबाग पोलिसांच्या मदतीने .. त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ वारकऱ्यांना चहा बिस्किटे देवून त्यांनी त्यांचे पुण्यनगरीत स्वागत केले . दिग्दर्शक आणि श्रीयश प्रतिष्ठानचे अध्यक्ष शार्दुल लिहिणे , मनसे चित्रपट सेनेचे कुणाल निंबाळकर , तसेच दिग्दर्शक सचिन पाटील ,दत्ता लोंढे , अभिनेत्री नीता दोंदे ,मंजुषा जोशी, आरती पाठक,अभिनेता योगेश सुपेकर सुनील पालकर, आनंद जोशी , जितेंद्र वाईकर , संतोष राऊत, पोलीस निरीक्षक रेखा साळुंके आदी मान्यवरांनी येथे वारकऱ्यांचे दुपारपासून रात्री उशिरापर्यंत स्वागत केले .
पहा एक व्हिडीओ झलक…..

