ओतुर – (sanjok kaldante)
नगर – कल्याण महामार्गावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार अशोक हरिभाऊ गांगड (वय २२ रा.लागाचा घाट,ब्राम्हणवाडा,ता.अकोले,जि. अहमदनगर) हा युवक जागीच ठार झाला असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार के. एम. पाटोळे यांनी दिली
हा अपघात शुक्रवारी(दि.३) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाला याबाबत अधिक माहिती अशी की अशोक गांगड हा युवक दुचाकी क्र एम.एच.१७ वाय११०२ वरून ओतुर कडून आळेफाटा बाजूकडे जात असताना समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम.एच.१२ के.पी. ९००७ ची डुंबरवाडी टोल नाक्याजवळ समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील अशोक हरिभाऊ गांगड हा युवक जागीच ठार झाला.


