ओतुर – दि.१६ (संजोक काळदंते)
निसर्गाचा अविश्कार आणि पर्यटकांना आपल्या सौंदर्याने भुरळ पाडणारा पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणारा माळशेज घाट पुण्हा बंद झाला असुन सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक दरड कोसळल्याने नगर – कल्याण महामार्गावर असणाऱ्या या घाटात मुरुम व दगडांचा राडारोडा झाला मात्र प्रशासनाच्या शर्तीच्या प्रयत्नांनी लवकरच एकेरी वाहतूक चालु करण्यात आली मोठ्या व जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला.
दाट धुके व संततधार पावसामुळे मलबा व रस्त्यावर आलेल्या दगडी लवकरच हटवनार असल्याचे प्रशासनाने सांगितले कुठलीही जीवित व वित्तहानी झाली नाही.येणा-या पर्यटकांच्या आणि प्रवाशांच्या दृष्टीने निसर्गरम्य माळशेज घाट दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे.
खैरे आणि खटकाळे या दोन गावांच्या दरम्यान रोडवर दरड कोसळली असल्याने रस्ता पुर्ण पणे बंद ठेवण्यात आला यानंतर एकेरी वाहतुकीस सुरुवात करण्यात आली.तर मोठ्या वाहनांना प्रवेश बंद केल्याने मालवाहतुक गाड्यांनी जवळपासच्या गावानजीक ढाबे आणि हॉटेल परिसराचा आधार घेत आपली वाहने लावली.

