Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पवार साहेबांचा शब्द कोणतेही सरकार डावलत नाही -अजित पवार

Date:

ओतुर  (संजोक काळदंते)-
 जनतेच्या हितासाठी पुणे नाशिक महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी लक्ष घालु सत्ता नसली तरी शरद पवार साहेबांचा शब्द कोणतेही सरकार डावलत नसुन त्यांच्या शब्दाला किंमत आहे” असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्नर येथे केले.सहकारमहर्षी शिवाजीराव महादेवराव तथा दादासाहेब काळे  या जुन्नर येथील नवीन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते.
        या कार्यक्रमासाठी जुन्नर म न से चे आमदार शरददादा सोनवणे,राष्ट्रवादी युवकचे राज्य उपाध्यक्ष  अतुल बेनके,विघ्नहर सहकारी साखर कारखाना चेअरमन सत्यशील शेरकर,इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे,पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते , जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष रमेशअप्पा थोरात, कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे सभापती(अध्यक्ष जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ) ॲड.संजय काळे,जुन्नर तालुका माजी आमदार बाळासाहेब दांगट,शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे,शिवनेर भूषण तात्यासाहेब गुंजाळ,बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे,माजी आमदार दिलीपराव ढमढेरे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते शिवछत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते
      यावेळी ॲड.संजय काळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, १९७० साली या शिक्षण संस्थेची सहकार महर्षी स्व. शिवाजीराव काळे यांनी स्थापना केली. या महाविद्यालयाला बेस्ट कॉलेज अवॉर्ड मिळाला आहे या संस्थेत सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते.सहकारमहर्षी माजी आमदार शिवाजीराव काळे हे १९५७ साली आमदार होते त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली दीड ते दोन लाख विध्यार्थ्यांनी या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतले आहे ३५ ते ४० प्राध्यापक या कॉलेज मध्ये आहेत या नवीन इमारतीसाठी ६ कोटी खर्च झाले आहेत या कॉलेज ला ग्रँड नाही त्यामुळे प्राध्यापकांचे पगार देणे कठीण झाले आहे म्हणून दादा तुम्ही यामध्ये लक्ष घालाल असे मला वाटते.मी छातीवर हात ठेवून सांगतो मी अजितदादा वर प्रेम करणारा नेता आहे असे संजय काळे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
      यानंतर विशेष गुणवत्ता धारक विद्यार्थी विद्यार्थीनीचा सत्कार सन्मान करण्यात आला
        यानंतर जुन्नर म न से आमदार शरददादा सोनवणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,जुन्नर तालुकाचे क्षेत्रफळ खूप मोठे आहे आणि या तालुक्यात कृषी क्षेत्रात १४०० कोटी रुपयांची उलाढाल होते या कॉलेज ला ६००० विध्यार्थी आहेत गुणवंत विध्यार्थी या कॉलेज मध्ये आहेत अत्याधुनिक डी एन ए लॅब,केमिस्ट्री लॅब,प्रयोगशाळा येथे आहेत शैक्षणिक क्षेत्रात हा तालुका अग्रेसर आहे. जुन्नर तालुक्यातील ९८ जिल्हा परिषदेच्या शाळांना आय एस ओ नामांकन मिळाले आहे.शिक्षणाची उच्च पातळी येथे आहे.पाणी हा नियोजनाचा विषय आहे तो राजकारणाचा विषय नाही.शेतीचा माल वाचवा म्हणून या ऑक्टोबर पासून पाण्याची आवर्तने सुरू झाली आहेत.दादांना मी एक विनंती करतो की,छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सर्व दैवत मानता पण जुन्नर तालुक्याला आतापर्यंत कधीच मंत्रीपद मिळाले नाही म्हणून माजी एकाच मागणी आहे जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात आहे एखादे महत्त्वाचे पद या जुन्नर तालुक्याला द्या,आम्हाला विकास पाहिजे.शिवनेरी विकास आराखडा आतर्गन १०० कोटी रुपयांचा निधी अजितदादामुळे आला.तसेच कुंभमेळा वेळी १२ कोटी रुपयांचे निधी अजित दादांनी पारुंडे या गावासाठी दिला.फंड तुम्ही दिला कामे आम्ही केली. दादा तुम्ही म्हणाल तर आपण अतुलदादांना पण आमदार बनवू.
[ मी महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहे मी आज म न से पक्षात आहे परंतु उद्या कोणत्या पक्षात असेल ते माहीत नाही असे शरददादा सोनवणे यावेळी बोलताना म्हणाले ].
      यानंतर अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पार पडले असे मी जाहीर करतो दादासाहेब काळे यांची चांगली पकड या जुन्नर आंबेगाव तालुक्यात होती शिक्षण क्षेत्रात अनेक नेत्यांनी काम केले आहे नवीन इमारती १०० वर्ष टिकल्या पाहिजेत या कॉलेज मधील विधार्यांना खेळात प्राविण्य मिळवता आले पाहिजे ॲड.संजय काळे यांनी चांगले काम केले आहे चांगली इमारत त्यांनी बांधली आहे येथील केमिस्ट्री लॅब,डीएन ए लॅब उत्तम आहे पुढच्या काळात अडीच वर्षांनी जुन्नर तालुक्याला एखादे महत्वाचे पद नक्कीच देऊ, जो पर्यंत जनता आम्हाला निवडून देते तोपर्यंत जनतेचे काम करण्याचे व्रत आम्ही घेतले आहे पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांक आलेल्या विध्यार्थ्याचे मी खूप खूप कौतुक करतो मुलींना संधी दिली की त्या या संधीचे सोने करतात मुली आज विविध क्षेत्रात काम करत आहेत महिला मुली यांचेकडे कोणीही वाकड्या नजरेने बघता कामा नये जेथे जेथे महिलांना मान सन्मान मिळत नाही तेथे ते राष्ट्र मागे राहते. मुला मुलींच्या मध्ये शिक्षणाबद्दल गोडी निर्माण झाली पाहिजे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग,आरोग्य विभगात अनेक जागा रिक्त आहेत परंतु या जागा भरल्या जात नाहीत सरकार या जागा भरत नाही मुला मुलींनो तुम्ही चांगला आभास करा ज्ञान संपादन करा मेरिट मध्ये राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आपला अंगात जे जे गुण आहेत त्यांना आपण वाव दिला पाहिजे मग कोणाच्या अंगात कलेचा वाव असेल तर कोणाच्या अंगात खेळाचा वाव असेल. खेळाडूंना विविध बक्षिसे दिली जातात त्यांना प्रशासकीय अधिकारी पदे दिली जातात म्हणून या संस्थेचा सर्वांनी फायदा घेतला पाहिजे. मराठी ही आपली मातृभाषा आहे त्याचे ज्ञान सर्वांना असले पाहिजे तसेच इंग्रजी ही देखील भाषा आपल्याला यायला पाहिजे.काही सत्ताधारी पक्षाचे आमदार मुलींना पळवून देण्याची भाषा करतात काहीही बोलतात काही आमदारानी तर मोदींना विष्णूचा अवतार बनवले आहे. पेट्रोल डिझेल चे भाव या सरकारने वाढवले आहेत आणि त्यांना देवाची उपमा देतात. महराष्ट्रात दुष्काळ आहे महाराष्ट्रातील खटाव तालुक्याचे,जुन्नर तालुक्याचे नावच या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत नाही. पाण्याचे नियोजन बिघडवून टाकले आहे. राज्यात ५ लाख पदे रिक्त आहेत ही पदे हे सरकार भरत नाहीत मुख्यमंत्री दुष्काळ जाहीर करीत नाही आम्ही आमच्या सरकारच्या काळात ताबडतोब दुष्काळ जाहीर केला होता. हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत या सरकाने शेतकऱ्यांना दिली पाहिजे या सरकारने २०१ कोटी रुपयांची इनकम टॅक्स ची नोटीस विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला दिली आता कोठून द्यायचे हे पैसे. भार नियमन केले जात आहे. जिल्हा परिषदेचा अधिकार आता पालकमंत्री यांना दिला आहे. पंचायत समितीच्या सदस्याला काही अधिकारच राहिला नाही जिल्हा परिषद सदस्यांचे पण अधिकार कमी केले आहेत. पर्यटनाला चालना दिल्या शिवाय रोजगार उत्पन्न होणार नाही परंतु आता हे सरकार त्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही. दुष्काळ जाहीर करा अशी अनेक निवेदने आमच्याकडे आली आहेत हे सरकार नुसत्या घोषणा करतय त्यांच्याकडे पैसाच नाही मूला मुलींनी संशोदान केले पाहिजे चांगले शिक्षण ज्ञान मिळवले पाहिजे आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे तुम्हाला जे जे शिक्षण अवडते तेच शिक्षण तुम्ही घ्या संजयराव काळे तुम्ही फार छान काम करत आहात याला कोणाची दृष्ट लागू देऊ नका संजय काळे तुम्ही मला एखादा मोठा प्रोजेक्ट सुचवा माझी ओळखीने आपण त्यासाठी मदत करू. मी तुम्हाला नाराज होऊ देणार नाही. निवडणूकीवर पैसा खर्च करण्यापेक्षा अशा चांगल्या कामावर पैसा खर्च करा.
[ शरद सोनवणे तुम्ही मी एकटा एकटा असे म्हणू नका. एकटे राहिल्यावर काय होते ते तुम्हाला माहीत आहे म्हणून चांगल्या कळपात या असा सल्ला अजित पवार यांनी म.न.से.चे आमदार शरद सोनवणे यांना दिला.]
कोणता कळप चांगला आहे याची शहानिशा करून तुम्ही पुढचे पाऊल उचला.आता तर हे सरकार ऑनलाइन दारू पुरवणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारायचे होते,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारायचे होते या सरकारने या स्मारकाचे साधी वीट तरी उभारली का? ही जनता तुम्हाला (या सरकारला) माफ करणार नाही. पुणे नाशिक हायवे झाला तर लोकांना मदत होईल जनतेचा वेळ वाचेल म्हणून आम्ही याकडे लक्ष घालू दिल्लीत कोणतेही सरकार असो परंतु तेथे पवार साहेबांच्या शब्दाला किंमत आहे असेही ते म्हणाले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...