वसतीगृहातील मुलांना मिळाला आनंदयात्रेत आनंद
ओतुर -(संजोक काळदंते)-
संपूर्ण ओतूर गाव आणि परिसर गावच्या यात्रेचा आनंद घेत असतो मग ते यात्रेतील खेळणी असोत कि पाळणे आणि यात्रेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थ यावर ताव मारत या यात्रेची मज्जा घेतली जाते यासाठी लागतात पैसे पण ते वसतिगृहातील लहान मुलांकडे येणार कुठून……..? त्यांनाही यात्रेची मज्जा घेता यावी या हेतूने जुन्नर तालुका सोशल युथ फौन्डेशन तर्फे ओतूर गावात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या आश्रम शाळेतील तसेच वसतिगृहातील तब्बल सहाशेच्या वर विद्यार्थ्यांना यात्रेची मजा दिली.यामुळे मुलांनी यात्रेचा पुरेपूर आनंद घेतला.यातून त्यांना मिळाले माता पित्याचे प्रेम……………..
जुन्नर तालुका सोशल युथ फौन्डेशन निराधार,मागासवर्गीय,आदिवासी,मु लांसाठी हा उपक्रम गेली २३ वर्षापासून राबवत असल्याचे अध्यक्ष भरत अवचट यांनी सांगितले.ओतूर मध्ये आनंदयात्रा या नावाने मुलासाठी राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन या वर्षी अतुल बेनके यांनी केले यावेळी सरपंच बाळासाहेब घुले,जि.प.सदस्य मोहीत ढमाले,पं.स.सदस्य विशाल तांबे,नितीन पाटील,स्मिता डुंबरे,दाजी धिरडे,सुनिल वैद्य,संजय वल्हवनकर,राजेंद्र संभूस,आभिषेक वलव्हनकर,पत्रकार रामनाथ मेहेर,पराग जगताप ,डॉ.डी.एस.थोरात,ग्रा.पं.सदस्या सविता थोरात, तंटामुक्ती अध्यक्ष तान्हाजी तांबे,गणपतशेठ डुंबरे, प्रशांत डुंबरे आदि उपस्थित होते.नंदुशेठ भोर,जयवंत डुंबरे,संतोष डुंबरे,अरुण डुंबरे,नितीन पन्हाळे,अजित कर्डिले,प्रा.अभिजीत डुंबरे, मिथिल ईसकांडे आदी उद्योजकांनी मुलांना वडापाव-जिलबी वाटप केले.बच्चम शर्मा, शिवसह्याद्री युवा मंचच्या युवकांनी आनंद यात्रेत सहकार्य केले.यावेळी वसतीगृहातील मुलांसाठी पिंपळवंडी येथिल मल्लखांब प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
या स्तुत्य उपक्रमाला अतुल बेनके यांनी भेट देऊन उद्घाटन प्रसंगी बोलताना ते म्हणाले कि अनाथ व आदिवासी तसेच वसतीगृहातील मुलांसाठी अशा प्रकारचा उपक्रम मोठी मेजवानी असते त्यांना आधार वाटतो असाच उपक्रम ईतर ठिकाणी अशा अनाथ निराधार आणि वसतीगृहातील मुलांसाठी राबविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले,तर अशा अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व घेणे गरजेचे होत आहे असेही ते म्हणाले .जुन्नर तालुका सोशल युथ फौन्डेशनचे अध्यक्ष भरत अवचट यांनी प्रास्ताविक,जयप्रकाश डुंबरे यांनी सुत्रसंचलन तर रत्नाकर धिरडे यांनी आभार मानले.


