Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भारतीय ऑलिंपिकपटूसाठी ‘एक स्वप्न, एक लक्ष्य’ मोहिमेचे आयोजन

Date:

·         लक्ष्य इन्स्टिट्यूट व ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशन यांचा संयुक्त विद्यमाने उपक्रम

·         या उपक्रमाअंतर्गत नेमबाजीमुष्टियुद्धकुस्तीबॅडमिंटन आणि टेबल टेनिस या खेळातील गुणवान खेळाडूंना प्रशिक्षण व साधन सामग्रीसाठी लक्ष्य इन्स्टिट्यूट व ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशन यांचा  पाठिंबा

पुणे, 3 सप्टेंबर 2021: राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार विजेत्या ‘लक्ष्य इन्स्टिट्यूट’ने ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशन(डीएसएफ) या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने एक स्वप्नएक लक्ष्य‘(वन ड्रीमवन लक्ष्य), या नव्या मोहिमेची घोषणा करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत पाच क्रीडा प्रकारांमधील सात गुणवान खेळाडूंची निवड करण्यात आली असून नजीकच्या भविष्यकाळात ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून चमकदार यश मिळविण्याकरिता या खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, सरावासाठी साधन सामग्री, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागाची संधी आणि या सगळ्यासाठी आवश्यक आर्थिक साहाय्य मिळवून देण्याकरिता या दोन संस्था प्रयत्न करणार आहेत. या उपक्रमाचे उदघाटन आज महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि ड्रीम स्पोर्ट्सचे पॉलिसी ऑफिसर व ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशनचे कार्यकारी प्रमुख किरण विवेकानंद यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या दोन संस्थांच्या भागीदारीच्या माध्यमातून ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशन(ज्यांनी नेत्राकुमाननला टोकियो ऑलिंपिकपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली) आणि लक्ष्य इन्स्टिट्यूट यांच्या वतीने नेमबाजी, मुष्टियुद्ध, कुस्ती, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या क्रीडा प्रकारातील 7 खेळाडूंना 2024 पॅरिस ऑलिंपिक आणि 2028 लॉज एंजेलीस ऑलिंपिकच्या तयारीसाठी दर्जेदार प्रशिक्षणाची व्यवस्था करणार आहेत. 

निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे(राज्यखेळाडूक्रीडा प्रकार व कामगिरी):-

महाराष्ट्र-नुपूर पाटील(19वर्षे)-नेमबाजी 10मीटर एअर रायफल-राष्ट्रीय प्रथम युवा मानांकन;

महाराष्ट्र-देविका घोरपडे(16वर्षे)-मुष्टियुद्ध 50 किलो-ज्युनिअर राष्ट्रीय विजेती व ज्युनियर आशियाई स्पर्धेत उपांत्य फेरी;

महाराष्ट्र-तारा शाह(16 वर्षे)-बॅडमिंटन एकेरी-राष्ट्रीय 17 वर्षाखालील अव्वल मानांकित व हंगेरीयन ज्युनिअर स्पर्धेत 19 वर्षांखालील गटात सुवर्णपदक;

तेलंगणा-श्रीजा अकुला(22 वर्षे)-टेबल टेनिस एकेरी-राष्ट्रीय अव्वल मानांकित व बुडापेस्ट महिला स्पर्धेत उपांत्य फेरी;

तेलंगणा-रिया हब्बू(17वर्षे)-बॅडमिंटन एकेरी-खेलो इंडिया स्पर्धेत रौप्य पदक;

हरियाणा-नुपूर शेवरान(22 वर्षे)-मुष्टियुद्ध 75 किलो गट-राष्ट्रीय द्वितीय मानांकित व राष्ट्रीय विजेती;

हरियाणा-सुनील कुमार(22वर्षे)-ग्रिको रोमन कुस्ती-87 किलो गट-राष्ट्रीय अग्रमानांकन, आशियाई ऑलिंपिक पात्रता फेरीत भारताचे प्रतिनिधित्व;

ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशनसह केलेल्या भागीदारीबद्दल बोलताना लक्ष्य फाउंडेशनचे उपाध्यक्ष स्वस्तिक सिरसीकर म्हणाले की, गेल्या वर्षभरात अनेक कॉर्पोरेट संस्था क्रीडा क्षेत्रातून अंग काढून घेत असताना ‘लक्ष्य’ या अभिनव उपक्रमाला ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशनने पाठिंबा दिल्याबद्दल आम्हांला अतिशय आनंद होत आहे. ‘वन ड्रीम, वन लक्ष्य’ या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक भारतीय खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करून 2024 व 2028 ऑलिंपिक मध्ये देशाला पदक जिंकून देतील, असा आम्हाला विश्वास वाटतो आहे. इतकेच नव्हे तर, या उपक्रमाच्या माध्यमातून आगामी काळात आणखीही अनेक खेळाडूंना मदत करता येईल असा मला विश्वास वाटतो. 

या उपक्रमाची प्रशंसा करताना ड्रीम स्पोर्ट्सचे पॉलिसी ऑफिसर व ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशनचे कार्यकारी प्रमुख किरण विवेकानंद म्हणाले की, कोरोना महामारीमुळे अनेक गुणवान खेळाडूंच्या दैनंदिन सरावावरही परिणाम झाला आहे. परंतु ना नफा, ना तोटा तत्वावर काम करणाऱ्या काही संस्थाच्या सहकार्याने या खेळाडूंच्या सरावात खंड पडणार नाही याची आम्ही काळजी घेत असून हे खेळाडू भविष्यात नक्कीच पदक जिंकतील. इतकेच नव्हे तर, गुणवान युवा खेळाडूंना उत्तम कामगिरी बजावून जागतिक स्तरावर भारतासाठी चांगली कामगिरी करण्याकरिता आम्ही सर्वोतोपरी मदत करू. 

गेल्या काही दिवसांपूर्वी ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशन यांनी मेरीकोम बॉक्सिंग फाउंडेशन आणि बायचुंग भूतीया फुटबॉल स्कुल यांच्याशी भागीदारी करून अनेक प्रतिभाशाली खेळाडूंना सराव, शिक्षण व आर्थिक मदत अशा विविध माध्यमातून बहुमोल साहाय्य केले आहे. याशिवाय ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशन यांनी सध्याच्या कसोटीच्या काळात अडचणीत सापडलेल्या 3500 हुन अधिक खेळाडूंना साहाय्य करून त्यांची कारकीर्द सावरली आहे. आपल्या स्थापनेपासून ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशनने आजपर्यंत 6000हुन अधिक खेळाडूंना मदत केली आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...