नवी मुंबई महापालिका आयुक्तांची घेतली भेट
नवी मुंबई, दि.२६- नवी मुंबईच्या कोविड टेस्टिंग सेंटरमधील प्रकार अतिशय धक्कादायक आहे.कोरोना काळात मेलेल्या माणसाचे टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार दुर्देवी असून याप्रकरणी केवळ चौकशी न करता तातडीने संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
नवी मुंबईच्या कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये घडलेला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी तातडीने आज नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार रमेश पाटील, माजी खासदार संजीव नाईक , भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत हेदेखील उपस्थित होते.
आयुक्तांची भेट घेतल्यानंतर दरेकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. दरेकर म्हणले की, आम्ही आतापर्यंत कोव्हिड सेंटर प्रकरणी १५० ते २०० पत्रं सरकारला दिली पण काहीच कारवाई झाली नाही. आरोग्यमंत्री हतबल झाले आहेत त्यांना परिस्थिती सांभाळणं अवघड जात आहे. मृत लोकांचे अहवाल दाखवतात, काही लोकं गावाला आहेत त्यांची माहिती घेऊन पररस्पर खोटे अहवाल तयार करून पैसे लाटणे सुरु आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची आकडेवारी फुगवण्याचा हा प्रकार निषेधार्ह आणि धक्कादायक आहे. याप्रकरणी केवळ चौकशी न करता तातडीने संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली.
राज्यातील कोरोना उपचार केंद्रातील विदारक परिस्थितीची अनेक उदाहरणे गेल्या काही दिवसांत समोर आली आहेत. यामध्ये आता कोविड टेस्टिंगमधील घोटाळ्याची भर पडली आहे. नवी मुंबईच्या कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. याठिकाणी १० वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल देऊन शासनाकडून पैसे लाटण्यात आल्याचा प्रकार नुकताच
केवळ चौकशी नको, तातडीने संबंधितांवर कडक कारवाई करा-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी
Date:

