डीएसके यांच्याबाबतचा अंतरिम अहवाल मांडण्याची तपास यंत्रणेला शेवटची संधी

Date:

पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्या उलाढालीची कुंडली मांडण्याची शेवटची संधी न्यायालयाने या गुन्ह्यातील तपास यंत्रणेला दिली आहे. दोन नोव्हेंबरला होणाऱ्या पुढील सुनावणीवेळी संबंधित रिपोर्ट सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.शुक्रवारी (ता.23) हा अहवाल सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले होते.मात्र शुक्रवारच्या सुनावणीस देखील अहवाल न आल्याने न्यायालयाने तपास यंत्रणेला आणखी एक संधी दिली आहे. विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. डीएसके यांनी ठेवीदार तसेच त्यांच्या व्यवसायातून आलेल्या पैशांचे काय केले? आर्थिक गैरव्यवहार नेमका कसा झाला? पैशांची हेराफेरी कधी व कशी झाली? त्यांनी कोणत्या नियमांचे उल्लंघन केले? याची माहिती या अहवालातून पुढे येणार आहे.तपास अधिकाऱ्यांनी 11 मार्च 2019 रोजी एका महिन्यात अंतरिम रिपोर्ट देऊ, असे न्यायालयास सांगितले होते. मात्र, अद्यापही तो सादर करण्याबाबतचा चालढकलपणा सुरूच आहे. त्याबाबत न्यायालयाने आदेश देऊनही रिपोर्ट सादर झालेला नाही. त्यामुळे न्यायालयाचा अवमान होत असल्याची प्रक्रिया सध्या सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयाने उच्च न्यायालयात पाठवावी, अशी मागणी बचाव पक्षाकडून करण्यात आली आहे

आयकर अपीलिय प्राधिकरणाने (आयटीएटी) 2015 साली दिलेल्या निकालानुसार, डीएसके यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या डीएसके ड्रीम सिटीच्या फुरसुंगी येथील जमिनीबाबत गैरव्यवहार झालेला नाही. तसेच त्याबाबत झालेले करारही बरोबर होते. त्यामुळे या रिपोर्टमधून काहीच साध्य होणार नाही, अशी भीती तपास यंत्रणेला आहे. त्यामुळे ते रिपोर्ट सादर करण्यास मुद्दाम उशीर करीत आहे, असे डीएसके यांचे वकील प्रतीक राजोपाध्ये आणि आशिष पाटणकर यांनी सांगितले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...