· भारतातील पहिला असा प्रकल्प ज्यामध्ये रुग्णवाहिकेतील रुग्णाला प्रशिक्षित डॉक्टरांकडून देखभाल सेवा मिळते
· २०१४ मध्ये सुरुवात झाल्यापासून डिसेंबर २०२१ पर्यंत बीव्हीजी एमईएमएसने ६७.७० लाखांहून जास्त रुग्णांना सेवा पुरवल्या आहेत.
· महामारी सुरु झाल्यापासून बीव्हीजी एमईएमएसने ५.९० लाखांहून जास्त कोविड-१९ रुग्णांना सेवा पुरवल्या आहेत.
· ३७६०० पेक्षा जास्त यशस्वी बाळंतपणांमध्ये बीव्हीजी एमईएमएसच्या डॉक्टरांनी रुग्णवाहिकांमध्ये सेवा पुरवल्या आहेत.
· बीव्हीजी एमईएमएसकडे तब्बल ९३७ पेक्षा जास्त रुग्णवाहिका आणि ३० बाईक फर्स्ट रिस्पॉन्स वाहनांचा ताफा आहे.
पुणे, १० जानेवारी २०२२: महाराष्ट्रामध्ये आणीबाणी वैद्यकीय सेवा (एमईएमएस) व्यवस्थापन करणाऱ्या बीव्हीजी इंडिया लिमिटेड या आघाडीच्या कंपनीने महामारी आणि कोविडच्या केसेसमध्ये होत असलेल्या वाढीचा मुकाबला करण्यासाठी जागतिक दर्जाच्या आणीबाणी प्रतिसाद सेवा आणि एमईएमएस १०८ टोल-फ्री रुग्णवाहिका सेवांसह आपण पूर्णपणे सज्ज असल्याची घोषणा केली आहे. महामारीच्या संपूर्ण कालावधीत बीव्हीजीच्या एमईएमएस आणि १०८ टोल-फ्री रुग्णवाहिका सेवांचे लाभ महाराष्ट्रातील लाखो लोकांना मिळाले. २०१४ मध्ये सुरुवात झाल्यापासून डिसेंबर २०२१ पर्यंत या कंपनीने ६७.७० लाखांहून जास्त रुग्णांना सेवा पुरवल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या सहयोगाने चालवली जाणारी बीव्हीजीची रुग्णवाहिका सेवा हा भारतातील पहिला प्रकल्प आहे ज्यामध्ये रुग्णवाहिकेतील रुग्णाला आवश्यक त्या सर्व योग्यता असलेल्या डॉक्टरकडून देखभाल सेवा पुरवल्या जातात. भारतातील बीव्हीजीव्यतिरिक्त इतर रुग्णवाहिकांमध्ये फक्त पॅरामेडिक कर्मचारी उपलब्ध असतात. रुग्णवाहिकांमध्ये पात्र, प्रशिक्षित डॉक्टरांनी रुग्णांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. याच्याच बळावर महामारीच्या काळात बीव्हीजी एमईएमएसने ५.९० लाखांहून जास्त कोविड-१९ रुग्णांना सेवा पुरवल्या आहेत आणि बीव्हीजी एमईएमएस डॉक्टरांनी रुग्णवाहिकांमध्ये कराव्या लागलेल्या ३७६०० पेक्षा जास्त यशस्वी प्रसूतींमध्ये मोलाची मदत पुरवली आहे.
कोविड-१९ महामारीच्या काळात पुरवलेल्या प्रतिसाद सेवा आणि आणिबाणीमध्ये असलेल्या रुग्णांसाठी असलेली आरोग्य यंत्रणेची सुसज्जता यामध्ये बीव्हीजी एमईएमएसने यशस्वी कामगिरी बजावल्याबद्दल महाराष्ट्राचे माननीय कॅबिनेट आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. जनता प्रचंड घाबरलेली होती आणि लोक आपापल्या घरांमध्ये सुरक्षित राहण्यालाच सर्वाधिक प्राधान्य देत होते अशा काळात १०८ रुग्णवाहिका सातत्याने धावत होत्या आणि गरजू रुग्णांना अथक सेवा पुरवत होत्या असे कौतुकोद्गार त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहेत.
बीव्हीजी एमईएमएस टीमकडून दिला गेलेला प्रतिसाद कौतुकास्पद आणि तत्पर होता असे खास नमूद करत श्री. टोपे यांनी म्हटले आहे, “रुग्णवाहिकांमध्ये काम करणारे डॉक्टर्स आणि पायलट्स यांच्यासह ३१० पेक्षा जास्त आणीबाणी प्रोफेशनल्सना कोविड-१९ चा संसर्ग झाला पण तब्येत बरी झाल्यानंतर ही संपूर्ण टीम रुग्णसेवेमध्ये पुन्हा दाखल झाली. ही बाब अतिशय वाखाणण्याजोगी आहे. मानवतेच्या जाणिवेतून समाजाची सेवा करण्याच्या व्रताचे पुरेपूर पालन ही टीम करत आहे.”
बीव्हीजी इंडियाने पुण्यातील औंध चेस्ट हॉस्पिटल येथून २४/७ संचालित केला जाणारा महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी, अत्याधुनिक, जागतिक दर्जाचा एमईएमएस उपक्रम हाती घेतला आहे. राज्यभरातील सर्व मोबाईल आणि लँडलाईन क्रमांकांवरून १०८ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येतो. या एमईएमएस सेवा यंत्रणेमध्ये ४२०० पेक्षा जास्त ईएमएस व्यावसायिकांना तैनात करण्यात आले आहे. मानवतेच्या नात्याने लोकांची सेवा करण्याची महान संधी त्यांना लाभत आहे. एमईएमएसमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण, डोंगरी आणि आदिवासी भागांमध्ये आरोग्यसेवा सुविधा पुरवल्या जाण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.
बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर (सीएमडी) श्री. हणमंतराव रामदास गायकवाड यांनी सांगितले, “रुग्णवाहिकेमध्ये प्रशिक्षित डॉक्टर्स असले पाहिजेत हे धोरण भारतात सर्वात पहिल्यांदा बीव्हीजी इंडियाने अवलंबिले आणि त्यामुळे आम्हाला रुग्णांची अधिक चांगल्या पद्धतीने सेवा करण्यात तसेच प्रशिक्षण व ज्ञान व्यवस्थापनामध्ये उत्कृष्टतेचे नवे मापदंड निर्माण करण्यात मदत मिळाली. अनेक मौल्यवान जीव वाचवण्याबरोबरीनेच, आणीबाणीच्या काळात केल्या जाणाऱ्या देखभालीच्या बाबतीत ईएमएस उपचार नियम ठरवणारे आणि त्यांचे पालन करणारे भारतातील पहिले राज्य ही ओळख महाराष्ट्राला मिळवून देण्यात आणि महाराष्ट्र ईएमएसचे मॅन्युअल तयार करण्यात देखील आम्ही मदत करू शकलो.”
एकात्मक नॅशनल हेल्थ मिशन (एनएचएम) स्थापन केल्यानंतर आणीबाणीच्या सेवांच्या उद्योगात २०१३ ते २०२१ या आर्थिक वर्षांमध्ये २५.८% सीएजीआरने वाढ झाली आहे आणि आर्थिक वर्ष २०२१ मध्ये याचा मार्केट आकार ३२.८ बिलियन रुपये झाला आहे.
बीव्हीजीने महाराष्ट्रातील ईएमएससाठी अतिशय यशस्वी आणि अनोखे संचालन मॉडेल तयार केले आहे. जागतिक दर्जाची उपकरणे (डिफिब्रिलेटर आणि ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर – जर्मनी, मेडिकल ग्रेड ऑक्सिजन डिलिव्हरी सिस्टिम – स्पेन); मेडिकल ग्रेड ऑक्सिजन डिलिव्हरी यंत्रणा असलेली देशातील पहिली रुग्णवाहिका आणि एआरएआयने प्रमाणित केलेली होमोलोगेटेड रुग्णवाहिका.
ईआरसीच्या संदर्भात बीव्हीजी एमईएमएसकडे अत्याधुनिक कंट्रोल रूम आहे, इतर विभागांसोबत अखंडित एकात्मीकरण करण्यात आले आहे, प्रत्येक रुग्णवाहिकेसाठी ५ रुग्णवाहिकांचा बॅक-अप आहे, घटना नेमकी कुठे घडली आहे ते अचूक ओळखता यावे यासाठी मॅपवर डायनामिक डिस्प्ले सुविधा आहे आणि एमईएमएस डॅशबोर्डवर सरकारी अधिकाऱ्यांना वास्तविक माहिती सहजपणे मिळू शकते.
बीव्हीजी इंडिया ही भारतातील एक सर्वात मोठी एकात्मिक सुविधा व्यवस्थापन सेवा कंपनी आहे. या कंपनीत ५४००० पेक्षा जास्त कर्मचारी (जून २०२१ च्या आकडेवारीनुसार) असून आर्थिक वर्ष २०२१ मध्ये कंपनीने १३० पेक्षा जास्त शहरांमधील ३५ पेक्षा जास्त क्षेत्रांमधील ५८२ ग्राहकांना सेवा पुरवल्या आहेत. औद्योगिक आणि ग्राहक क्षेत्र, वाहतूक आणि दळणवळण पायाभूत सोयीसुविधा क्षेत्र, रुग्णालये व आरोग्यसेवा क्षेत्र आणि सरकारी आस्थापना अशा विविध क्षेत्रांतील ग्राहकांना बीव्हीजी आपल्या सेवा पुरवते. बीव्हीजी ही भारतातील धार्मिक संस्थांना सेवा पुरवणाऱ्या मोजक्या कंपन्यांपैकी एक आहे. (माहिती स्रोत: एफअँडएस रिपोर्ट) आपल्या एकात्मिक सेवा व्यवसायांतर्गत बीव्हीजीने २०१९ मध्ये रेल्वे स्थानक व्यवस्थापन सेवा पुरवल्या. एकात्मिक सेवा आणि सुविधा व्यवस्थापन सेवांच्या बरोबरीने बीव्हीजी वैद्यकीय आणीबाणी आणि पोलीस आणीबाणीच्या काळात आणीबाणी प्रतिसाद सेवा तसेच कचरा व्यवस्थापन सेवा देखील पुरवते. आणीबाणी पोलीस प्रतिसाद सेवा पुरवण्यासाठी कंत्राट देण्यात आलेली बीव्हीजी ही भारतातील पहिली कंपनी आहे. (माहिती स्रोत: एफअँडएस रिपोर्ट) या सेवांच्या बरोबरीनेच बीव्हीजी सुविधा व्यवस्थापन प्रकल्पांची देखील अंमलबजावणी करते, ज्यामध्ये प्रामुख्याने गार्डनिंग आणि लँडस्केपिंग सेवांचा समावेश आहे. एकात्मिक सेवा उद्योगांतर्गत बीव्हीजीने औद्योगिक आणि ग्राहक क्षेत्रातील प्रमुख ग्राहकांना सेवा पुरवल्या आहेत. वाहतूक व दळणवळण पायाभूत सोयीसुविधा क्षेत्रात बीव्हीजीच्या ग्राहकांमध्ये मेट्रो रेल लिमिटेड, महामार्ग व वाहतूक प्राधिकरणे यांचा समावेश होतो. या कंपनीने विविध महानगरांमधील १६ वेगवेगळ्या विमानतळांना देखील सेवा पुरवल्या आहेत. रुग्णालये आणि आरोग्यसेवा क्षेत्रामध्ये त्यांच्या ग्राहकांमध्ये विविध शहरांमधील सरकारी रुग्णालयांचा समावेश आहे.
बीव्हीजी ही भारतातील पहिली कंपनी आहे जिला आणीबाणी पोलीस प्रतिसाद सेवा पुरवण्यासाठी कंत्राट देण्यात आले आहे, हा देशातील अतिशय अनोखा प्रकल्प आहे. आणीबाणी प्रतिसाद सेवा उद्योगक्षेत्रात सेवा प्रदान करणारी बीव्हीजी ही आघाडीची कंपनी आहे. ३० जून २०२१ च्या आकडेवारीनुसार १४०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका आणि ३० बाईक रुग्णवाहिकांच्या ताफ्यासह ही कंपनी महाराष्ट्र आणि जम्मू व काश्मीरमध्ये कार्यरत आहे. डिफिब्रिलेटर्स, रक्तदाबावर लक्ष ठेवणारे उपकरण, पल्स ऑक्सिमेट्री आणि मेडिकल ग्रेड ऑक्सिजन पुरवणारी यंत्रणा यांच्यासह सुसज्ज असलेली पहिली रुग्णवाहिका बीव्हीजीने सादर केली आणि डॉक्टरांसह रुग्णवाहिका सादर करणारी ही भारतातील पहिली कंपनी आहे. ३० जून २०२१ पर्यंत या कंपनीने ३३.१५ मिलियनपेक्षा जास्त (३.३२ कोटी) कॉल्सना प्रतिसाद दिला असून आणीबाणीत असलेल्या तब्बल ७.५६ मिलियन (७५.६ लाख) रुग्णांना सेवा पुरवल्या आहेत. फेब्रुवारी २०१४ ते जून २०२१ या कालावधीत बीव्हीजीने आणीबाणीमुळे रुग्णवाहिकांमध्ये कराव्या लागलेल्या ३७००० हुन जास्त प्रसूतींमध्ये मदत पुरवली आहे. बीव्हीजीच्या होमोलोगेटेड रुग्णवाहिकांना ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (एआरएआय) प्रमाणित केले आहे. महाराष्ट्रामध्ये बीव्हीजीकडून पुरवल्या जाणाऱ्या रुग्णवाहिका जागतिक दर्जाच्या उपकरणांसह सुसज्ज आहेत आणि प्रत्येक रुग्णवाहिकेसोबत विशेष डॉक्टर्स उपलब्ध असलेले हे देशातील एकमेव राज्य आहे. कंपनी आपल्या स्वतःच्या माहिती तंत्रज्ञान पायाभूत सोयीसुविधांसह कमांड सेंटर सेवा पुरवते. बीव्हीजी ही भारतातील एकमेव अशी कंपनी आहे जी त्यांच्या आणीबाणी वैद्यकीय प्रतिसाद सेवांचा भाग म्हणून मूल्यवर्धित सेवा पुरवते, ज्यामध्ये त्यांच्या रुग्णवाहिकांमध्ये वैद्यकीय कर्मचारी तैनात करण्याचा समावेश होतो तसेच ही कंपनी महाराष्ट्रातील आदिवासी समुदायांना नियतकालिक मूलभूत आरोग्य तपासणी सुविधा प्रदान करते.
महाराष्ट्रात, बीव्हीजी एमईएमएस सेवा अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ याठिकाणी उपलब्ध आहेत.
मुंबई तसेच पालघर, गडचिरोली, अमरावती आणि सोलापूरमधील ग्रामीण भागांमध्ये प्रशिक्षित ईएमएस कर्मचाऱ्यांसह ३० बाईक आणीबाणी वैद्यकीय प्रथम प्रतिसाद वाहने तैनात करण्यात आली आहेत. १०८ कंट्रोल रूममध्ये कॉल आल्यानंतर सर्वात जवळचा बाईक आणीबाणी वैद्यकीय प्रथम प्रतिसादकर्ता आणि रुग्णवाहिका यांना पाठवले जाते. बाईक आणीबाणी वैद्यकीय प्रथम प्रतिसादकर्त्याकडे ट्रॉमा किट, मेडिकल किट, एयरवे मॅनेजमेंट किट आणि डिलिव्हरी किट अशी चार किट्स असतात. मेडिकल किटमध्ये अड्रेनलाईन, एट्रॉपाईन, फ्र्युस्माईड, इन्हेलर्स अशी आणीबाणीच्या वेळी वापरली जाणारी औषधे असतात. स्ट्रोक, हृदयाचा धक्का, अस्थमा अशी कोणतीही वैद्यकीय आणीबाणी उद्भवलेली असल्यास त्यांचा उपयोग होतो. ट्रॉमा किटमध्ये एअर स्प्लिंट्सपासून फ्रॅक्चर झालेले असल्यास त्या भागाला तात्पुरते स्थिर करण्यासाठी लागणारी उपकरणे, विविध प्रकारची बँडेजेस, अँटी-सेप्टिक आणि एनलजेसिक स्प्रे इत्यादी सर्व साधनसामग्री असते. एअरवे किटमध्ये वयस्क व्यक्ती, लहान मुले आणि नवजात बालकांना कृत्रीम श्वासोच्छवास देण्यासाठी एएमबीयू बॅग्स, ऑक्सिजन सिलिंडर, एअरवेज, सक्शन मशीन असतात ज्यामुळे श्वास घेण्यात अडथळा येत असलेल्या आणि बेशुद्ध रुग्णांना मदत पुरवता येते. डिलिव्हरी किटमध्ये हातमोजे, गाऊन, नाळ कापण्यासाठी वापरली जाणारी कैची, चिमटे इत्यादी वस्तू असतात, आणीबाणीच्या परिस्थितीत जर घरीच प्रसूती करावी लागली तर त्यांचा उपयोग होतो.