मुंबई- कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे रूळ ओलांडणारी एक वयोवद्ध व्यक्ती मुंबई-वाराणसी एक्स्प्रेससमोर आली. मात्र, लोको पायलटने वेळीच प्रसंगावधान राखल्यानं मोठा अनर्थ टळला.मुंबई-वाराणसी ट्रेन 02193 चे प्रधान आणि एएलपी रविशंकर यांनी कल्याण येथे आपत्कालीन ब्रेक लागू केले आणि ट्रॅक ओलांडणार्या ज्येष्ठ नागरिकाला वाचवले. त्यांना सावध करण्यासाठी सीपीडब्ल्यूआय संतोष कुमार यांनी आरडाओरडा केलारेल्वे इंजिन खाली अडकलेल्या वयोवृद्ध नागरिकाला सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ मध्य रेल्वेनं सोशल मीडियावर शेअर करत रुळ न ओलांडण्याचं आवाहन केलं आहे. प्रसंगावधान दाखल्याबद्दल लोको पायलटसह इतर अधिकाऱ्यांना २००० हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं.
रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला मिळाले जीवनदान … (व्हिडीओ)
Date:

