Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नृत्यभारतीचा अमृत महोत्सवी सोहळा येत्या १० तारखेला

Date:

पुणे ता. ७ : केवळ कथकच नव्हे, तर संपूर्ण सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात ज्यांचे नाव अभिमानाने घेतले जाते, अशा जगविख्यात नृत्यांगना पंडिता रोहिणीताई भाटे यांनी स्थापित केलेली नृत्यभारती कथक डान्स ॲकॅडमी ही संस्था यंदा ७५ वर्षे पूर्ण करीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रम घेणे शक्य नसले तरी, संस्थेने ‘स्मृतिगंध ‘हा व्हर्चुअल कार्यक्रम आयोजित केला आहे. 
येत्या शनिवारी (दि.१०) सायंकाळी ७ ते ८.१५ या वेळेत ‘ नृत्यभारती कथक ‘ (Nrityabharati Kathak) या फेसबूक पेजच्या माध्यमातून हा अमृतमहोत्सवी सोहळा रसिक प्रेक्षकांना पाहता येईल. रोहिणीताईंचे स्वत:चे नृत्य तसेच त्यांच्या काही अतुलनीय नृत्यरचनांचे संक्षिप्त दर्शन या माध्यमातून रसिकांना घडेल. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा पुन:प्रत्यय यातून रसिकांना नव्याने अनुभवता येईल. 


‘नृत्यभारती’ म्हणजे पुण्यातील कथकचे आणि गुरु-शिष्यांचे परस्परबंध जपणारे सुवर्णपान. ज्याकाळी स्त्रियांनी नृत्य करणे हे अमान्य होते, अशा काळात विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन जगविख्यात कथक नृत्यांगना पंडिता रोहिणीताई भाटे यांनी नृत्यभारती कथक डान्स ॲकॅडमी सुरु करण्याचे धाडसी पाऊल उचलले. इतकेच नव्हे नृत्य हे शिक्षणाचे अंग बनवण्यापर्यंत त्यांनी संस्थेची वाटचाल नेली. 
आज नृत्यभारतीच्या शिष्या हीच परंपरा पुढे नेत आहेत. गुरूंकडून आत्मसात केलेल्या शैलीसह बदलत्या काळाप्रमाणे त्यास नवतेची व सृजनशीलतेची जोड देत या शिष्या आज नृत्यभारतीचा वारसा अभिमानाने जपत आहेत. सादरीकरणाप्रमाणेच रियाज आणि सूक्ष्म अभ्यासावर भर देणारा नृत्यभारतीचा सर्वच शिष्य परिवार अनेक दिग्गज व मान्यवर कलाकारांच्या प्रशंसेस पात्र ठरत आहे. 
याआधी संस्थेचे रौप्य, सुवर्ण, हीरक महोत्सवी अशा महत्वपूर्ण टप्प्यांवर मोठे कार्यक्रम झाले. केवळ मैफल इतकं मर्यादित स्वरूप न राहता सांस्कृतिक उत्सवच ठरलेले हे सोहळे रसिकांच्या मनावर कायमच कोरले गेले. आजही हाच उत्साह नृत्याभारतीच्या कलाकारांमध्ये असला तरी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत यावर्षी संस्थेने ऑनलाईन / व्हर्चुअल कार्यक्रम आखला आहे. 
गुरु पं. रोहिणीताईंचे विचार, नृत्य व रचनांचे अवलोकन घरबसल्या रसिकांना उपलब्ध व्हावे, यासाठी वर्षभर व्हर्चुअल कार्यक्रम घेण्याचा देखील संस्थेचा मानस आहे. तरी, संपूर्ण पुणेकरांसाठी अभिमान ठरणाऱ्या ‘ स्मृतिगंध’ या सोहळ्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील गारठ्यात आणखी वाढ होणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील गारठ्यात...

बिबट्या अखेर पुणे विमानतळावर पकडला….

पुणे-पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात गेल्या आठ महिन्यांपासून वावर असलेला...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन:वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लातूर-देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज...