पुणे – महापालिकेतील भ्रष्टाचार काही थांबायचे नाव घेईनासे दिसते आहे.अवघ्या काही महिन्यांपूर्वीच विधी सल्लागारास अँँटीकरप्शनने पकडल्यानंतर आता महानगरपालिकेच्या कोथरुड क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त सचिन चंद्रकांत तामखेडे (वय-34), कनिष्ठ अभियंता अनंत रामभाऊ ठोक (वय-52), शिपाई दत्तात्रय मुरलीधर किंडरे(वय-47) तिघांना 15 हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबं-धक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे युनिटच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर कारवाई केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.याबाबत 31 वर्षीय कंत्राटदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी कोथरुड येथील ड्रेनेज लाईन व काँक्रिटीकरणाच्या कामाचे बिल मिळण्यासाठी सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांची भेट घेतली. त्यावेळी तामखेडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.
तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीची अधिकाऱ्यांनी 31 मार्च रोजी पडताळणी केली असता तक्रारदार यांच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी तामखेडे यांनी तडजोडीत 15 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांच्याकडून लाच घेण्यासाठी कनिष्ठ अभियंता अनंत ठोक याने मदत केली.
सोमवारी (दि.11) पुणे एसीबीने कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात सापळा रचला. तक्रारदार यांनी सचिन तामखेडे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी लाचेची रक्कम अनंत ठोक यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार हे ठोक यांच्याकडे लाचेची रक्कम देण्यासाठी गेले. मात्र, ठोक यांनी लाचेची रक्कम शिपाई दत्तात्रय किंडरे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी किंडरे यांच्याकडे लाचेची 15 हजार रुपयांची रक्कम दिली. किंडरे याने लाचेची रक्कम स्विकारल्यावर तिघांना ताब्यात घेण्यात आले.
Trap Case Report:
➡ घटक :- पुणे
➡ तक्रारदार :- पुरूष ३१ वर्ष
➡ आरोपी :-
१.सचिन चंद्रकांत तामखेडे.
सहायक आयुक्त,वर्ग -2 कोथरूड क्षेत्रीय कार्यालय, मनपा, पुणे.
२.अनंत रामभाऊ ठोक.कनिष्ठ अभियंता
३.दत्तात्रय मुरलीधर कींडरे. कार्यालयीन शिपाई.
▶️पडताळणी दिनांक :- ३१/०३/२०२२
➡️लाचेची मागणी:-२५,०००/- तडजोडी अंती १५,०००/-
➡️ लाच स्वीकारली :- १५,०००/-
➡️ सापळा दिनांक:- ११/०४/२०२२ व
➡ हकीकत :- यातील तक्रारदार हे मनपा कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी केलेल्या कामाचे बिल मिळणेकरीता यातील आलोसे क्र.०१ यांनी २५ हजार लाच मागणी केलेबाबत तक्रार केली होती.सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि.३१/०३/२०२२ रोजी पडताळणी करण्यात आली त्यावेळी आलोसे क्र.०१ तामखेडे यांना भेटले असता त्यांनी बिल मंजूर करून देणेकरिता तक्रारदार यांना २५ हजाराची लाच मागितली त्यास आलोसे क्र ०२ ठोक यांनी तक्रारदार यांना लाच देणेबाबत प्रोत्साहित केले होते.
त्या अनुषंगाने आज रोजी सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार लाच रक्कम घेवून आलोसे क्र.०१ यांचेकडे गेले असता त्यांनी आलोसे क्र.०२ यांचेकडे लाच रक्कम देण्यास सांगितले त्यावरून तक्रारदार त्यांना भेटले असता आलोसे क्र. ०२ यांनी कार्यालयीन शिपाई आलोसे क्र.०३ यांना लाच रक्कम स्वीकारण्यास सांगितले वरून आलो से क्र.०३ यांनी कोथरूड वॉर्ड ऑफिस येथे १५,०००/- रुपयांची लाच आज रोजी स्वीकारल्यावर तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे आले आहे .
➡ सापळा पथक : –
पो.नि. भारत साळुंखे,
पो.नि. प्रवीण निंबाळकर,
पो.काॅ.भूषण ठाकूर, ला.प्र.वि.पुणे युनिट .
➡मार्गदर्शन अधिकारी :-
श्री राजेश बनसोडे,पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे परिक्षेत्र.
श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे.

