शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात क्लीन चिटच्या बंपर ऑफर ? ..आता प्रसाद लाड यांना 10 कोटींच्या फसवणूकप्रकरणी क्लीन चिट

Date:

मुंबई-शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांना क्लीन चिटच्या बंपर ऑफर सुरू झाल्यात कि काय ? असा प्रश्न पडावा असे वृत्त हाथी आले आहे,प्रवीण दरेकर, किरीट सोमैया यांच्यानंतर मुंबई पोलिसांनी आता भाजपचे आणखी एक नेते आणि विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड यांना 10 कोटींच्या फसवणूकीप्रकरणी क्लीन चिट दिली आहे. व्यापारी बिमल अग्रवाल यांनी प्रसाद लाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

प्रसाद लाड यांच्यावर काय होते आरोप?

प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल ट्रेडकॉम प्रायव्हेट लिमिटेड आणि हणमंत गायकवाड यांच्या बीव्हीजी लिमिटेड यांनी संयुक्त उपक्रमाद्वारे बीव्हीजी-क्रिस्टल नावाची कंपनी स्थापन केल्याचा आरोप बिमल अग्रवाल यांनी केला आहे. लाड आणि गायकवाड यांनी स्थापन केलेल्या जॉइंट व्हेंचर कंपनीला मुंबई महापालिकेच्या जलसाठा आणि पंपिंग स्टेशनजवळ भिंत बांधण्याचे टेंडर मिळाले. अग्रवाल यांच्याशी सामंजस्य करार करून त्यांनी हे काम त्यांना दिले. या कामाच्या मोबदल्यात अग्रवाल यांच्या कंपनीच्या वतीने लाड व गायकवाड यांना 5 टक्के रॉयल्टी देण्याचे ठरले. काम पूर्ण झाल्यावर लाड आणि गायकवाड यांनी निविदांची संपूर्ण रक्कम त्यांच्या संयुक्त कंपनीच्या खात्यात वर्ग केल्याचा आरोप आहे. या कंपनीकडून जवळपास 10 कोटी रुपये घ्यायचे आहेत. मात्र, प्रसाद लाड व गायकवाड ही रक्कम त्यांना देत नाहीत, असा आरोप बिमल अग्रवाल यांनी केला होता.

प्रसाद लाड यांच्याविरोधात पुरावा नाही

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2014 सालच्या या प्रकरणी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. हे संपूर्ण प्रकरण दिवाणी वादाचे असून त्यात प्रसाद लाड यांना आरोपी बनवण्यासाठी कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

प्रवीण दरेकरांना क्लीन चिट

देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक तपास शाखेकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना एकापाठोपाठ जुन्या प्रकरणांमध्ये क्लीन चिट देण्यात येत आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. (मुंबई बँक) आर्थिक अनियमितता प्रकरणात भाजपचे विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. या बहुचर्चित राज्यातील कथित बँक घोटाळ्यात 123 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

किरीट सोमय्यांनाही क्लीन चिट

‘सेव्ह आयएनएस विक्रांत’ मोहिमेतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नीला यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी ‘सेव्ह आयएनएस विक्रांत’ मोहिमेतून ५७ हजार कोटींचा घोटाळा केला होता. असा आरोप करण्यात आला होता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुढील पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक- डॉ. नीलम गोऱ्हे”

वेल्स संसद भेटीत महाराष्ट्र प्रतिनिधी मंडळाचा सहभाग; शाश्वत विकास...

‘हिंद-दी-चादर’कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेकडून संपूर्ण सहकार्य-महापौर मंजुषा दीपक नागपुरे

पुणे, दि.२०: #श्रीगुरुतेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम...

कलाकार कट्टा,हटविण्यामागील राजकारण उघड, सह्यांची मोहीम सुरू…

पुणे: शहरातील गुडलक चौकातील ऐतिहासिक कलाकार कट्टा स्थलांतरित करण्याच्या...

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात २२७ उमेदवारांची निवड

पुणे, दि. २०: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या...