पुणे, – कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर प्रथम ती गोष्ट करण्याची मनाची इच्छा पाहिजे. माणसाच्या जीवनात इच्छाशक्तीला फार महत्त्व आहे. आनंदी, परिपूर्ण आणि समाधानी जीवन जगण्यास प्रत्येकजण पात्र आहे. कोणत्याही औषधाला एक्सपायरी डेट असते त्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील प्रत्येक समस्येला सुद्धा एक अंतिम तारीख असते. मनाच्या शक्तीचा उपयोग करून व्यक्ती, समाज आणि संस्था यशस्वी होऊ शकतात. त्यासाठी पुढील ५ वर्षात १ हजारहून अधिक प्रशिक्षक तयार करण्याबरोबरच जगातील पहिले “माईंड पॉवर कॉलेज” सुरू करण्याचे महत्त्वाकांक्षी स्वप्न उराशी बाळगत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध माइंड ट्रेनर सुदर्शन साबत यांनी केले.
पुण्यात आयोजित मनशक्ती प्रशिक्षण शिबिरात बोलताना सुदर्शन साबत म्हणाले की, मनाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांनी केवळ सकारात्मक विचार करण्याची शक्तीच वाढवली नाही तर अनेक लोकांच्या जीवनातही परिवर्तन घडवून आणले आहे. वर्षानुवर्षे मनशक्ती तंत्राद्वारे लोकांनी जीवनात हव्या असलेल्या आश्चर्यकारक गोष्टी साध्य केल्या आहेत. हे प्रशिक्षक एकत्रितपणे लोकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या समस्यांना कसे सामोरे जायचे आणि जीवनातील अडथळे कसे दूर करायचे हे शिकवतात. करिअरमधील आणि जीवनातील समस्यांचे निराकरण करण्याबरोबर यशस्वी कसे व्हावे आणि स्वप्ने प्रत्यक्षात कशी आणावीत याविषयी सुदर्शन साबत यांनी माहिती दिली आहे.
भारताचे सर्वोत्तम माईंड ट्रेनर सुदर्शन साबत हे “सुदर्शन ग्रुप ऑफ कंपनी”चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या अर्ध्या दशकात ११ व्यवसाय विकसित केले आहेत. त्यांनी ५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट माइंड ट्रेनर पुरस्कार जिंकले आहेत. त्यामुळे इतर कोणत्याही उपाधिपेक्षा ‘इन्फोप्रेन्योर’ या उपाधीला त्यांनी मान्यता दिली. “माइंड विनर वर्ल्ड विनर”, “रिच माइंड ब्लूप्रिंट” आणि “डेअर युअर माइंड-टु थिंक बियॉन्ड” या पुस्तकांचे ते लेखक आहेत. इंग्रजी, हिंदी, ओडिया, गुजराती आणि मराठी भाषेतील त्यांची इतर २१ पुस्तके २०२३ मध्ये प्रकाशित होणार आहेत.
सुदर्शन साबत हे भारतातील सर्वात जास्त मागणी असलेल्या माइंड ट्रेनर्सपैकी एक आहेत. आतापर्यंत त्यांनी शेकडो प्रशिक्षण कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या प्रशिक्षणामुळे अनेकांना त्यांच्या जीवनात उत्तम यश मिळाले आहे. लोकांना त्यांचे ध्येय शोधण्यात आणि साध्य करण्यात मदत करण्यासाठी सुदर्शन साबत यांनी अनेक मनशक्ती कार्यशाळा आयोजित केल्या. व्यापक अनुभव आणि लोकांचे वर्तन समजून घेण्याचे सखोल ज्ञान असल्याबरोबर सुदर्शन साबत यांना विविध उद्योगांमध्ये मिळालेल्या यशामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली.
शिक्षणाद्वारे गरिबीचे चक्र तोडण्याच्या उद्देशाने साबत यांनी आर्यन फाउंडेशनची स्थापना केली. आर्यन फाउंडेशनद्वारे भारतातील गरिबी कमी करण्यासाठी लहान मुलांना शिक्षण त्याचबरोबर महिला, तरुण आणि वृद्धांना मदत दिली जाते आणि व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षणही दिले जाते.