मुंबई-गुलामीच्या खुना कुणी ठेवत नाही, हे लक्षात औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर केले आहे. नामांतराला जातीय किंवा धार्मिक अॅंगल नाही. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटेंच्या अभिष्टचिंतनाच्या वेळी म्हटले आहे.
जगाच्या पाठीवर कुणाही देशात आक्रमण कर्त्याचा पुरस्कार करत नाही, त्यांचा सन्मान होत नाही. आक्रमणाच्या पाऊल खुना सर्व जण पुसून टाकतात असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. औरंगजेब असेल त्यांचे औरंगाबाद असेल, उस्मानाबाद असेल हे या देशातील राजे नाही, त्यांनी देशावर आक्रमण करून देशाच्या सांस्कृतिक आणि सामान्य माणसांवर अत्याचार केले. ज्यांच्या विरुद्ध संभाजीमहाराजांनी बलिदान दिले, त्यांच्या पाऊलखुणा आम्ही पुसतोय, आणि स्वराज्य स्थापण झाले असे भासवणारे नाव आम्ही देतेाय असे म्हणत औरंगाबाद आणि उस्मनाबादच्या नामांतरास कुणी विरोध करू नये असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. काही जण यास जातीय आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र असे न करता याकडे गुलामीच्या पाऊलखुणा पुसण्याच्या दृष्टीने बघा असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
ही महाराष्ट्राची संस्कृती
महाराष्ट्राला स्वत:चा विचार करायला शिवाजी महाराजांनी शिकवले नाही. त्यांनी महाराष्ट्राला इतरांचा विचार करायला शिकवले आहे. जेव्हा जेव्हा देशाला मदतीची गरज पडली तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने ताकदीने मदत केली आहे. हा महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती आहे. असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवसेना आणि भाजपसह इतर सर्व मित्रपक्षांचे हे सरकार जनसामान्याच्या साठीचे सरकार आपण स्थापण केले आहे.
सत्तेचा वाटा सर्व घटकपक्षांना
शिवसेना आणि भाजपचे सरकार असले तरी सत्तेचा वाटा सर्व घटकपक्षांना देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सर्व घटकपक्षांना सत्तेत स्थान देत महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करण्याचा या सरकारचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

