Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘मनोबल-ताकद आत्मविश्वासाची’ नित्यानंद पुनर्वसन केंद्रातर्फे ​जनजागृती ​उपक्रम

Date:

 

पुणे: जागतिक मानसिक आरोग्य दिन संपूर्ण जगभरात १० आॅक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिनानिमित्त नित्यानंद पुनर्वसन केंद्रातर्फे जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ आॅक्टोबर (रविवार) रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत, ‘मनोबल- ताकद आत्मविश्वासाची’ हा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्षश्री. योगेश गोगावले उपस्थित असतील तसेच ह्या क्षेत्रातील तज्ञ मंडळी डॉ. विद्याधर वाटवे (past president IPS), डॉ. दत्तात्रय ढवळे (Senior consultant Psychiatrist), डॉ. शिरीषा साठे, अनुराधा करकरे मादाम, श्री. श्रीरंग उमराणी व डॉक्टर दलाया ही उपस्थित असतील अशी माहिती आज पत्रकार परिषदेत मेडिकल संचालक डॉ. नितीन दलाया यांनी दिली.

मनोबल हा सर्वांसाठी मोफत कार्यक्रम असून स्क्रीझोफ्रेनिया आणि व्यसनाधीनता यांसारख्या महत्त्वाच्या विषयावर माहिती दिली जाणार आहे. डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येकी १०० मागे एकजण स्क्रीझोफ्रेनिया पासून ग्रस्त आहे तर प्रत्येकी ७ मागे एकजण व्यसनाचे बळी ठरत आहे.

नित्यानंद पुनर्वसन केंद्र २००२ साली सुरू करण्यात आले. त्यावेळी ४० मनोविकार पिडीत व्यक्ती येथे उपचार घेत होत्या. आज या केंद्राच्या दोन शाखा असून साधारणपणे ३०० जणांवर निवासी उपचार केले जात आहेत. हा उपचार शारीरिक-मानसिक-सामाजिक तत्वांवर आधारीत आहे. यामध्ये औषधोपचार, समुपदेशन आणि ग्रुप थेरपी व या व्यक्तींच्या कलागुणांना वाव देता येईल या नुसार प्रशिक्षित केले जाते. ज्यामुळे रुग्नांना घरात आणि समाजात वावरताना विचार आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यास व त्यांच्यातील कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते.

यावेळी डॉ. दलाया म्हणाले, “एकविसावे शतक अनेक आव्हाने आणि ताणतणावांचे असणार आहे. मानसिक आजाराचा प्रार्दुभाव आणि प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे याबद्दल जागरूकता निर्माण करणे फार गरजेचे आहे. यामाध्यमातून मानसिक आजार आणि त्यावरील उपचार आणि उपलब्ध सुविधा याबद्दल माहिती दिली जाणार आहे. लवकर निदान आणि वेळेवर हस्तक्षेप यावर आमचा विश्वास आहे.”

केंद्रात २००६ साली दरमहा सुमारे १६ जणांनी प्रवेश घेतला होता तर २०१५ पर्यंत प्रवेश घेणार्यांची संख्या दरमहा ६० झाली. यावरून असे दिसून येते की मानसिक रूग्नांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्रातर्फे २०१२ मध्ये साधारण ९०० ओपीडी करण्यात आल्या होत्या तर २०१३ मध्ये ही संख्या १५०० पर्यंत पोहोचली तर २०१५ मध्ये हा आकडा ३००० झालेला आहे.

पूर्वी ३०-४० वयोगटतील लोक व्यसनाचे बळी ठरत होते परंतू, आता १५-२० वयोगटातील मुले व मुलीसुद्धा व्यसनाधीन होत आहेत. त्यामुळे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेतल्यास व्यसनाधीन व्यक्ती लवकर बरा होऊ शकतो. मनोबल हे त्यासाठी उचललेले पहिले पाऊल असून जागरूकता निर्माण करण्यात सर्वांची मदत मिळेल हि अपेक्षा.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...

ध्वज दिन निधीला हातभार लावूया… सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुया.. !

7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त राज्यस्तरीय...