पुणे – कोरोना च्या महामारित डायलेसिस चे व कोरोनाच्या रुग्णास प्लेटलेट्स आवश्यक असतात. कोणत्याही रुग्णास रक्ताची कमतरता भासू नये यासाठी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात सर्व राजपूत बांधवांनी एकत्र येऊन 12 जुलै रोजी, मराठा भांडेवाल्यांची धर्मशाळा,गुरुवार पेठ या ठिकाणी
राजपूत सोशल वॉरियर्स च्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात स्वयंस्फुर्तीने महिला व पुरुष अश्या 223 लोकांनी शिबिरात सहभाग घेतला.
या वेळी या शिबिरात 171 वेळा रक्तदान केलेले महाराष्ट्र शासन पुरस्कृत राज्यस्तरीय रक्तकर्ण पुरस्कार विजेते किशोर गिरमे यांच्यासह स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने,आंनद सराफ,राजेश येनपुरे,प्रमोद कोंढरे,तेजेंद्र कोंढरे, राम बांगड़,ललित खंडाळे,रवी सहाने,विश्वास मणेरे,नीलेश जोशी,दिनेश भिलारे,योगेश वाडेकर,यादव पुजारी,राजेंद्र काकड़े व अन्य मान्यवरांनी उपस्थित राहून शिबिरात सहभाग नोंदवला
रक्तदात्यांनी जी समाजाप्रती जागरूकता दर्शवली व रक्तदानास उस्पूर्त असा प्रतिसाद दिला त्या बद्दल समस्त राजपुत सोशल वॉरियर्स च्या सहकार्यांनी त्यांचे आभार मानले तसेच या कार्यक्रमासाठी ज्या बांधवांनी प्रत्यक्ष,अप्रत्यक्षरित्या मार्गदर्शनरूपी प्रेरणा देऊन सहकार्य केल अशा सर्व मान्यवरांचे आम्ही आभार व्यक्त करतो या शिबिराचे आयोजन स्वप्नील नाईक, किशोर रजपूत,शैलेश बढाई यांच्या सह पुण्यातील समस्त राजपूत बांधवांनी केले