प्रख्यात अभिनेता विनोद खन्ना यांचे निधन …

Date:

मुंबई-ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून मुंबईतील खासगी रुग्णालायत उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुलं असा परिवार आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला विनोद खन्ना यांना गिरगावच्या एचएन रिलायन्स फाउंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी खन्ना यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काही दिवसांनी त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. पण तरीही प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा झाली नसल्याने त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.

विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ मध्ये पेशावर येथे झाला. भारत पाकिस्तान फाळणीनंतर विनोद खन्ना यांचे कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झाले. १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमातून विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर अनेक सिनेमात सहाय्यक अभिनेता आणि खलनायकाच्या भूमिका साकारत त्यांनी आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. १९७१ मध्ये ‘हम तूम और वो’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेता म्हणून काम केले. विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘अमर, अकबर, अँथनी’ या सिनेमांमधून आपल्यातील अभिनय गुण दाखवून दिले होते.

त्यानंतर त्यांचा ‘हिरो’ म्हणून प्रवास सुरुच झाला. २०१५ मध्ये आलेला ‘दिलवाले’ हा त्यांनी काम केलेला अखेरचा सिनेमा. विनोद खन्ना यांचा आगामी सिनेमा ‘एक थी रानी ऐसी भी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलर लॉन्चला खास बिग बींनीही हजेरी लावली होती. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे विनोद खन्ना हजर राहू शकले नव्हते.

१९९७ मध्ये विनोद खन्ना राजकारणात सक्रीय झाले. भाजपाचे पंजाबमधील गुरुदासपुरचे खासदार म्हणूनही ते निवडून आले होते.

‘अमर अकबर अँथोनी’ या सिनेमातील विनोद खन्ना यांचे सहकलाकार ऋषी कपूर यांनी या सिनेमाचा एक फोटो पोस्ट करुन, “Will miss you Amar. RIP”, असे ट्विट केले.
ऋषी कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विनोद खन्ना यांना श्रद्धांजली वाहिली. अभिनेते रजनीकांत यांनी ट्विटरवर लिहिले, “My dear friend Vinod Khanna… will miss you, RIP. My heartfelt condolences to the family.”
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद मोदी यांनीही विनोद खन्ना यांना श्रद्धांजली वाहिली. अक्षय कुमार, करण जोहर, काजोल, महेश भट, अजय देवगन, अनुष्का शर्मा, नाना पाटेकर, सोनाक्षी सिन्हा, रवीना टंडन यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली दिली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणेकरांना वाहन चालवण्याच्या (अनुज्ञप्ती) चाचणीसाठी मारावे लागणारे हेलपाटे थांबवा -दीपक मानकर यांची मागणी

पुणे -शहराची लोकसंख्या पाहता पुण्यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी सुसज्ज...

​​​​​​​मोरेश्वरासह 5 गणपती मंदिरांत ड्रेसकोड:दर्शनाला जाताना पुरुषांनी सभ्य अन् महिलांनी पारंपरिक वस्त्रे घालण्याची ताकीद

पुणे-अष्टविनायकांपैकी मोरेगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी व सिद्धटेकच्या सिद्धिविनायकासह इतर...

दीनानाथ रुग्णालयाने समाजसेवक प्रकाश आमटेंकडूनही 5 लाख घेतले

मुंबई-काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांवर पुन्हा एकदा...