मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जरी धनंजय मुंडे यांच्या बाबतीत नरमाईची भूमिका घेतलेली असली आणि मुंडे यांना आता राजिनामा देण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. मात्र भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा अधिक उचलून धरला आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंडेची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. आणि सोशल मिडीयावर मुंडे आणि पक्षाच्या विरोधात रान उठवले जात आहे. शुक्रवारी सुद्धा भाजपातर्फे तिसऱ्या दिवशी सोशल मिडीयावर हॅशटॅग शेम धनंजय मुंडे अशा ट्रेंड सुरु होता.बलात्कार प्रकरणी आरोप झाले ते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, आक्रमक आमदार अतुल भातखळकर आणि माजी खासदार किरीट सोमैय्या मैदानात उतरलेले आहेत. महाराष्ट्र भाजपा मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी राज्यभर सोमवारपासून आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सुदधा मुंडे यांच्या राजिनाम्याची मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष यांनी तर मुंडेच्या राजिनाम्याच्या मागणीसाठी जोर लावला आहे. भातखळकर यांनी तर हे संपूर्ण प्रकरण लाजीरवाणे असून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंडेवर ताबडतोब कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली आहे. तर माजी खासदार किरीट सोमैया हे मुंडेच्या विरोधत निवडणुक आयोगात तक्रार करण्यास दाखल झाले आहेत. मात्र दुसरीकडे भाजपाचा एक गट मुंडेवर लावण्यात आलेले आरोपांना फारसे महत्त्व देताना दिसून येत नाहीए. यावरुन भाजपात अंतर्गत या प्रकरणावरुन दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र शरद पवार यांनी गुरुवारी सांगितले होते की, हे प्रकरण गंभीर आहे. पक्ष यावर निश्चितच चर्चा करेल आणि लवकरता लवकर निर्णय घेईल. आपल्या मंत्र्यावर बलात्काराचे आरोप लागल्यामुळ पवार सुद्धा नाराज झाले आहेत. मात्र शुक्रवारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीमध्ये निर्णय घेतला की, मुंडे यांचा राजिनामा पोलीसांचा रिपोर्ट येत नाही तोपर्यत घेण्याची कोणतीही गरज नसल्याचे सांगितले. मात्र भाजपाच्या नेत्या विरुद्ध सुद्धा या महिलेने तक्रार केली आहे हे माझ्या कानावर आले तेव्हा मी सुद्धा या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. शरद पवार यांच्या यूटर्नमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र अशा प्रकारच्या प्रकरणात शरद पवार हे कधीही कुणाला अभय देत नाहीत अशी त्यांची प्रतिमा आहे. मात्र आपल्याचं मंत्र्यावर अशा प्रकारचे आरोप लागल्यानंतरही मंत्र्याचा राजिनामा घेण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने जरी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना अभय दिले असले तरी भाजपा मुंडेच्या राजिनाम्याची मागणी करतच राहणार आहे. सोशल मिडीयावर मुंडेंच्या विरोधात ट्विटस,पोस्ट आणि मिम्सचा पाऊस पडत आहे.