दिल्ली-अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने कथित नॅशल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ईडीने नॅशनल हेराल्डच्या कार्यालयाला टाळे ठोकले आहे. आगावीच्या परवानगीशिवाय कार्यालय खोलू नये असे निर्देश ईडीने दिले आहेत.
नॅशनल हेराल्ड कथित आर्थिक गैरव्यहारप्रकरणी ईडीने दिल्लीस्थित नॅशनल हेराल्डच्या कार्यालयाला टाळे ठोकले आहे असून परवानगीशिवाय हा परिसरात खुला करु नये असे निर्देश ईडीने दिले आहेत. या गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. याच प्रकरणात ईडीने सोमवारी नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा टाकून तपास केला होता. त्यानंतर आता या कार्यालयाला टाळे ठोकण्याची कारवाई करण्यात आली आहे.
या छाप्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी नॅशनल हेराल्ड कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली. ईडीच्या कारवाईवर राहुल गांधी म्हणाले होते- काँग्रेस तुमच्या लोकांची आहे आणि तुम्ही काँग्रेसची ताकद आहात. हुकूमशहाच्या प्रत्येक हुकुमाशी लढायचे आहे.