मुंबई दि. 16- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बायोपिक असलेल्या पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाचे सह- निर्माते अमित वाधवानी यांनी काही अज्ञात व्यक्तींनी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. यासंदर्भात त्यांना व त्यांच्या कुटुंबियाना अश्लिल फोन व जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. यासंदर्भात मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांची आज भेट घेतली व त्यांनी याप्रकरणात तातडीने कारवाईचे आदेश संबंधितांना दिल्याची माहिती विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी यावेळी दिली.
प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, याप्रकरणी शालिनी शर्मा यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. हा विषय अतिशय संवेदनशील आहे. ज्या काही विघातक प्रवृत्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी व हिंदुत्वाच्या विरोधात काम करित आहेत, त्याच प्रवृत्ती यामागे असल्याचा आमचा समज आहे. म्हणून मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेतली व यामागे ज्या कोणी विघातक प्रवृत्ती आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई करावी. तसेच ज्यांच्या कुटुंबियांना धमकी आली आहे, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावा अशी विनंती त्यांना करण्यात आली.यावेळी अमित वाधवानी सुध्दा उपस्थित होते. त्यानंतर आयुक्तांनी तात्काळ संबंधितांना सूचना देऊन यासंदर्भात लक्ष देऊन कारवाईचे आदेश दिले आहेत अशी माहिती दरेकर यांनी यावेळी दिली.