जुन्नर/आनंद कांबळे
जुन्नर ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी रत्नाकर आवटे तर कार्याध्यक्षपदी अनिल जोगळेकर यांची बिनविरोध निवड
जुन्नर ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी रत्नाकर आवटे तर कार्याध्यक्षपदी अनिल जोगळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिक संघ जुन्नर पंचवीस वर्षापासून कार्यरत असून संघाचे 602 सभासद आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे.एल. वाबळे यांनी काम पाहिले.
सन 2019 ते 2021 या कालावधीसाठी निवडलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे ……
उपाध्यक्ष -सुधाकर वाडकर, सचिव -गोविंद हिंगे, सहसचिव -श्रीकांत देशपांडे, कोषाध्यक्ष -सिताराम जाधव, कार्यकारिणी सदस्य-अजित काका परदेशी, पोपट भास्कर, माधव बारवे, सुभाष आवटे, सुभाष चौधरी, सुरेखा आढाव.
आगामी काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, आरोग्य शिबिरे, विविध व्याख्याने व समाजोपयोगी उपक्रम यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष रत्नाकर आवटे यांनी सांगितले. विविध मान्यवरांकडून नविन कार्यकारिणीचा सत्कार व स्वागत करून शुभेच्छा देण्यात येत आहेत.