मुंबई-मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची वार्षिक साधारण सभा नुकतीच दादर येथे झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी मा.ना शरद पवार होते. संस्थेचे उपाध्यक्ष डाँ.भालचंद्र मुणगेकर, आमदार विद्या चव्हाण, श्री.शशी प्रभू तसेच संस्थेचे विश्वस्त अरविंद तांबोळी,
खा.संजय राऊत,खा.अनिल देसाई,श्री. प्रताप आसबे आणि कार्यकारी मंडळ व साधारण सभा सदस्य उपस्थित होते.सभेचे सूत्रसंचालन श्री. हेमंत जोशी यांनी केले.
संस्थेच्या विकास व प्रगतीच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन महत्वपूर्ण ठराव करण्यात आले.दरहू सभेत संस्थेची गेल्या आर्थिक वर्षातील हिशेबपत्रके मंजूर करण्यात आली.
संस्थेस केलेल्या विशेष सहकार्याबद्दल शीतल करदेकर यांचे आभार मानण्यात आले.तसेच शीतल करदेकर यांची एनयुजे इंडिया,नवी दिल्ली या पत्रकारांच्या संघटनेच्या राष्ट्रीय सचिव नियुक्ती झाल्याबद्दल मा. शरद पवार यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले
संस्थेला डिजीटायझेशनसाठी राज्य सरकारने ५ कोटी रूपयांची मदत केल्याबद्दल सरकारचे आभार मानण्यात आले.