पुणे, : ‘कोरोना व्हायरस’मुळे सर्वाधिक बाधित झालेल्या भागांना आवश्यक वस्तू पुरवून महाराष्ट्र राज्य सरकारला मदत करण्यास देशातील खासगी क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी बॅंक, अॅक्सिस बँक कटिबद्ध आहे. पुणे महानगरपालिका, पुण्यातील ससून रुग्णालय, सीपी-पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, सीपी-पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था व तेथील अधिकाऱ्यांच्या सहयोगाने नागरिकांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी अॅक्सिस बँक कार्य करीत आहे.
अॅक्सिस बँकेच्या या सामाजिक उपक्रमाची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अॅक्सिस बँकेचे प्रेसिडेंट व ब्रॅंच बॅंकिंग विभागाचे प्रमुख रवी नारायणन यांचे कौतुक केले आहे.
‘कोरोना व्हायरस’च्या बाधितांची संख्या वाढत असताना, ती रोखण्यासाठी व राज्यातील कोरोनाच्या साथीला आळा घालण्यासाठी अनेक अत्यावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेची व पुरवठ्याची गरज आहे. पीपीई किट, एन-95 वॉशेबल मास्क, सॅनिटायझर, मोबाईल क्लिनिक, इन्ट्यूबेशन बॉक्स, सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशन, स्प्रे पंप, थर्मल आयआर गन, ऑक्सिमीटर आदी वस्तू व उपकरणे अॅक्सिस बँकेतर्फे कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना व नागरिकांना आतापर्यंत पुरविण्यात आल्या आहेत.
याव्यतिरिक्त, या कठीण काळातही राज्यभरातील आपल्या ४७३ इतक्या विस्तृत शाखांच्या माध्यमातून बॅंकिंग व आर्थिक सेवा सुरळीत राहतील, याची दक्षता बॅंकेने घेतलेली आहे.
‘अॅक्सिस बँके’विषयी:
अॅक्सिस बँक ही भारतातील खासगी क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी बँक आहे. ही बँक मोठ्या आणि मध्यम कंपन्या, एसएमई, कृषी आणि किरकोळ व्यवसाय करणाऱ्यांना अनेकविध सेवा प्रदान करते. 31 मार्च 2020 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, अॅक्सिस बँकेच्या देशभरात 4,528 शाखा व विस्तारीत कक्ष, तसेच 12,044 एटीएमही आहेत. बँकेचे नेटवर्क 2,521 केंद्रांमध्ये उपलब्ध आहे. यातून बॅंकेच्या सेवांची व उत्पादनांची मोठी व्याप्ती अनेक स्तरांतील ग्राहकांना मिळते. अॅक्सिस समुहामध्ये अॅक्सिस म्युच्युअल फंड, अॅक्सिस सिक्युरिटीज लि., अॅक्सिस फायनान्स, अॅक्सिस ट्रस्टी, अॅक्सिस कॅपिटल, ए.ट्रेड्स लि., फ्रीचार्ज आणि अॅक्सिस बँक फाउंडेशन यांचा समावेश आहे.
अॅक्सिस बँकेच्या अधिक माहितीसाठी, कृपया https://www.axisbank.com ही वेबसाइट पाहा.