फेसबुकवर लाइव्ह स्ट्रीमिंग सुरु करून न्यूझीलंडमध्ये मशिदींवर हल्ला 49 ठार-वर्णद्वेषातून स्थलांतरित लोकांचे झालेले भीषण हत्याकांड

Date:

ख्राइस्टचर्च – न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये शुक्रवारच्या नमाजासाठी एकत्र आलेल्या स्थलांतरित नागरिकांवर नमाजापूर्वी भीषण हल्ला झाला. कोणत्याही देशातील स्थलांतरितांवर झालेला हा आजवरचा सर्वात भीषण वर्णद्वेषी हल्ला आहे. गौरवर्ण श्रेष्ठतेतून झालेल्या या गोळीबाराचा मुख्य आरोपी ऑस्ट्रेलियातील आहे. त्याने प्रथम अल नूर मशिदीमध्ये घुसून गोळीबार केला. त्यात ४१ लोक मृत्युमुखी पडले, ४० जखमी झाले. त्यानंतर तो साडेसहा किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या मशिदीत गेला आणि तेथे ७ जणांना ठार केले. त्याने २१ मिनिटांत हे भीषण कृत्य केले. मशिदीत घुसण्यापूर्वी त्याने फेसबुकवर लाइव्ह स्ट्रीमिंग सुरू केले. न्यूझीलंडमधील भारतीय उच्चायुक्त संजीव कोहली यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ६ भारतीय मृत झाल्याची माहिती आहे. मात्र सरकारने अद्याप त्यास दुजोरा दिलेला नाही.हल्लेखोर ब्रेंटनने ७४ पानी जाहीरनामा अगोदर दिला, श्वेतवर्णीयांच्या हक्कासाठी हे कृत्य केल्याचे सांगितले
“हा हल्ला युरोपात स्थायिक होणाऱ्या स्थलांतरित नागरिकांना रोखण्यासाठी केला आहे. मी त्यांच्यात दहशत पसरवून ठार मारून संपवेन.’

महिलेसह ४ अटकेत, मुख्य आरोपी पाकमध्ये गेला होता 
२८ वर्षीय हल्लेखोर ब्रेंटन टॅरंट ऑस्ट्रेलियाचा रहिवासी असून त्याच्यासोबत अन्य एक महिला व त्याच्या दोन हस्तकांनाही अटक करण्यात आली आहे. टॅरंट काही महिन्यांपूर्वी पाकलाही गेला होता.

ख्राइस्टचर्चमध्ये भारतीय वंशाचे ३० हजार नागरिक हल्ल्यानंतर नऊ भारतीय बेपत्ता
हल्ल्यानंतर ख्राइस्टचर्चमध्ये राहणारे ९ भारतीय बेपत्ता आहेत, असे उच्चायुक्त संजीव कोहली यांनी टि्वट करून सांगितले. वकिलातीत भारतीय कुटुंबीयांचे सतत फोन खणखणत आहेत. स्थानिक माहितीनुसार हल्ल्यावेळी चार भारतीय व पाच मूळ भारतीय वंशाचे नागरिक मशिदींत उपस्थित होते. यामध्ये दोन हैदराबादचे, एक पुण्याचा व एक गुजरातचा आहे. न्यूझीलंड सरकारने त्यांच्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्यांना मृत मानले गेलेले नाही. ख्राइस्टचर्चमध्ये भारतीय वंशाचे ३० हजार नागरिक वास्तव्यास आहेत.

प्रत्यक्षदर्शी फरीद अहमद म्हणाले, मी मेल्याचे भासवले म्हणून वाचलो…
नमाजापूर्वी एक शस्त्रधारी व्यक्ती आली. त्याने दरवाजा बंद करत गोळीबार सुरू केला. लोक पळू लागले. मी पळू शकलो नाही. माझ्या शेजारच्या लोकांना गोळ्या लागल्या. माझ्या कपड्यावर त्यांचे रक्त उडाले. मी आशा सोडली होती. हल्लेखोर एकेकाला टिपत होता. माझे रक्ताने माखलेले शरीर पाहून मी गतप्राण झालो आहे, असे हल्लेखोराला वाटले. नंतर तो दुसऱ्या खोलीत गेला. पाहतो तर माझ्या आजूबाजूला २४ वर मृतदेह होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...