वनाझ ते रामवाडी नव्याने होणा-या मेट्रोला छत्रपती जिजाऊ माँसाहेबाचे नाव द्यावे – नगरसेवक दिपक मानकर

Date:

पुणे: वनाझ ते रामवाडी या नव्याने होणा-या मेट्रोला छत्रपती जिजाऊ माँसाहेबाचे नाव दयावे अशी मागणी नगरसेवक दिपक मानकर यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे केली. पुण्यातील लाल महाल येथे छत्रपती जिजाऊ माँसाहेबांच्या 423 व्या जयंतीदिनानिमित्त शिवप्रभु फांऊडेशनच्या वतीने जिजाऊ रत्न पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे,नगरसेवक दिपक मानकर, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेविका स्मिताताई कोंढरे, नगरसेवक रविंद्र धंगेकर, निवृत्ती बांदल, राज देशमुख, परागमामा मते उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करणा-या मातांना गौरवण्यात आले. यामध्ये सुनंदाताई भागवत, अलका संभाजी बेलदरे, रेखाताई दिलीप ढमढेरे, सोनुबाई दत्तोबा माळवदकर, राधिका सुनिल देशमुख, भारतीताई प्रकाश कदम, आशाताई रतनशेठ बालवडकर, पार्वतीताई शंकर निवंगुणे, लिनाताई विद्याधर अनास्कर, शोभाताई रामदास माने, नंदाताई निवृत्ती बांदल, कमळाबाई महादु भोंडवे, शारदाबाई मोहनराव होले, सरलाताई सुरेश आगवणे, अंजनाताई हिरामन वाघोले, रुक्मिनीताई विठ्ठलराव तरडे, सुषमाताई संजय चोरडीया यांना जिजाऊरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिवप्रभू फाउंडेशन, जिजामाता तरुण मंडळ, लालमहाल महोत्सव समिती यांच्यावतीने शिवाजी हुलावळे, आप्पा भोसले, दिपक कापरे, प्रतिक हुलावळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

छत्रपती शिवाजी राजे ना जिजाऊ माँसाहेबांनी जे संस्कार दिले आणि या संस्कारातुन जे स्वराज्य घडविले अशा जिजाऊच्या विचारांचे संस्कार युवा पिढीवर व्हावेत याकरता जुन्नरच्या परिसरात शिवसंस्कार सृष्टी साकारली जाणार आहे. अशी माहिती शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली. शिवाजी महाराजांवर जे संस्कार दिलेत ते संस्कार आजच्या पिढीवर झालेत तर आदर्श अशी पिढी तयार होऊन या देशाचे नाव उज्वल करतील. ज्यांनी स्वराज्याची शपथ घेऊन ते स्वराज्य मिळविले. शोषित, गरीबांवर होणारे अत्याचार महाराजांनी दुर केले. प्रसंगी शत्रुच्या पत्नीचाही आदर केला. अशा राजेना ज्यांनी संस्कार दिले अशा माँसाहेबाचे विचाराची सृष्टी शिवनेरीच्या परिसरात होणार आहे. त्याचा फायदा नक्कीच या पिढीला होईल असा विश्वास कोल्हे यांनी या वेळी व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पुण्याच्या क्रीडा विश्वाला नवा आयाम देणार’:केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

⁠खासदार क्रीडा महोत्सवाचा पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाने समारोप पुणे (प्रतिनिधी) :...

मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढू:ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांचा घणाघात

मुंबई -महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्टार प्रचारकां’ची फौज मैदानात

महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेच्या वक्त्यांची यादी जाहीर मुंबई | दि. २५...