सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठीच नविन बांधकाम नियमावली – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

Date:

पुणे-महाराष्ट्र शासनाने नुकतीच संपूर्ण राज्याकरिता (मुंबई शहर वगळता)बांधकाम क्षेत्रासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली (Unified DCPR) मंजूर केली आहे. शासनाच्या या क्रांतिकारी व पुरोगामी निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. या निमित्ताने क्रेडाई महाराष्ट्र व एमसीएचआय यांनी संयुक्तपणे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व नगर विकास विभागाचे अधिकारी यांचा सत्कार सोहळा ऑनलाईन वेबिनारद्वारे नुकताच पार पडला. 
याप्रसंगी बोलताना या बांधकाम नियमावलीद्वारे सर्वसामान्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास व घराच्या किंमती नियंत्रणात राहण्यासाठी मदत  होणार आहे असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. या नियमावलीमुळे राज्याच्या विकासावर व बांधकाम व्यवसायावर दूरगामी व चांगले परिणाम होणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांना देखील भरीव मदत होणार आहे. बांधकाम व्यवसाय हा शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारा व्यवसाय असून गेली तीन-चार वर्षांपासून या व्यवसायाला आलेली मरगळ दूर होऊन मोठ्या प्रमाणात व्यवसायात चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी केले. क्रेडाई सामाजिक बांधिलकी जपून कोविड कालावधीमध्ये हॉस्पिटल उभारणीसाठी संपूर्ण राज्यभर केलेल्या मदतीचा व निसर्ग वादळात कोकण किनारपट्टीमध्ये केलेल्या कार्याचा खास उल्लेख त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला. 
शासनाने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयासाठी एकनाथ शिंदे व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे या मंत्री मोहोदयांचा तसेच या नियमावली मंजुरी प्रकियेमध्ये अविरत परिश्रम घेतलेले नगरविकास प्रधान सचिव भूषण गगरानी,नगर रचना संचालक सुधाकर नागपुरे , नगर रचना सहसंचालक प्रकाश भुक्ते व अविनाश पाटील यांचा देखील सत्कार क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव परीख यांनी केला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर,उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, पुणे शहर अध्यक्ष सुहास मर्चंट यांच्या प्रमुख उपस्थितीत  हा सोहोळा पार पडला. 
सत्कार प्रसंगी बोलताना नगर विकास प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी सदर नियमावलीमध्ये सर्वसामान्य नागरिक हा केंद्रबिंदू असल्याचे सांगून त्यास जगन्नथाच्या रथाची उपमा देऊन सर्वच घटकांनी विशेषतः क्रेडाईने याकामी दिलेल्या सहकार्याचे कौतुक केले. 
क्रेडाई महाराष्ट्र तर्फे या पारदर्शक नियमावलीचे स्वागत करताना सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दारात घरे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राज्याध्यक्ष राजीव परीख यांनी दिले तर राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांनी हि नियमावली अत्यंत प्रोत्सानात्मक असून पुढील २० वर्ष या नियमावलीद्वारे सर्व बांधकाम व्यावसायिक चांगले कार्य करतील अशी ग्वाही दिली ,अशी सर्वसमावेशक नियमावली देशभर लागू व्हावी असे मत देखील व्यक्त केले. 
या वेबिनारमध्ये या बांधकाम नियमावलीमध्ये असलेल्या प्रमुख बाबींचे सादरीकरण भुक्तेसाहेब यांनी केले. तसेच क्रेडाई सदस्यांच्या नियमावलीबाबतच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देखील दिली. राज्यभरातून जवळपास ६०० बांधकाम व्यवसायिक व वास्तुविशारद यांनी या वेबिनारमध्ये सहभाग नोंदविला. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...

पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम संपन्न

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचे पुण्यामध्ये विशाल स्वच्छता...

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा खालावली:डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा, पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल

पुणे:राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार...