सिस्का अ‍ॅक्सेसरीजतर्फे नवे सिस्का EB0865 इयरग्रुव्ह्ज लाँच

Date:

मुंबई५ सप्टेंबर २०२२ – सिस्का अ‍ॅक्सेसरीज या भारतातील मोबाइल अ‍ॅक्सेसरीज क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने नवे सिस्का इयरग्रुव्ह्ज लाँच केले आहेत. सिस्का इयरग्रुव्ह्जमध्ये टच सेन्सर्स आणि रोबस्ट बास देण्यात आले आहेतशिवाय त्यांची कामगिरी ध्वनीचा उत्तम अनुभव देणारी असते.

आकर्षक डिझाइन, अत्याधुनिक ध्वनी दर्जा आणि दीर्घकाळ वापरतानाही मिळणारा आरामदायीपणा या वैशिष्ट्यांमुळे सिस्का इयरग्रुव्हज अधिक दर्जेदार झाले आहे. भारतात तयार करण्यात आलेल्या या इयरग्रुव्ह्जचा उच्च दर्जाचा ध्वनी सुस्पष्ट आहे. त्याशिवाय यातील इनबिल्ट ५.१ ब्लुटुथमुळे कोणत्याही उपकरणासह इयरग्रुव्ह्ज सहजपणे पेयर करता येते. महत्त्वाचे म्हणजे, केवळ दहा मिनिटांच्या चार्जिंगमध्ये हे इयरफोन्स १२० मिनिटांचा प्लेटाइम देतात. इतकेच नाही, तर या इयरबड्स केसमध्ये २००० एमएएच पॉवरबँक देण्यात आली आहे. चार्जची गरज असतानाही इयरग्रुव्ह्ज परिपूर्ण व दर्जेदार अनुभूती देतात. 

सिस्का इयरग्रुव्हजच्या लाँचविषयी सिस्का समूहाच्या कार्यकारी संचालक श्रीमती ज्योत्स्ना उत्तमचंदानी म्हणाल्या, ‘वायरलेस ऑडिओ क्षेत्रात सिस्का इयरग्रुव्हज लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे, कारण या बाजारपेठेत देशभरात मागणी दिसून येत आहेत. हे इयरग्रुव्हज तंत्रज्ञान, डिझाइन आणि दर्जाचा योग्य मेळ असून सक्रिय जीवनशैली जगणाऱ्यांना ते आकर्षक अनुभव देतात. सिस्कामध्ये आम्ही सातत्याने ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी उच्च दर्जा असलेल्या व कंटेटचा अनोखा अनुभव देणाऱ्या अ‍ॅक्सेसरीज तयार करण्यावर भर देतो.’

सिस्का इयरग्रुव्हजची महत्त्वाची वैशिष्ट्ये

·         अत्युच्च ध्वनी दर्जा – दर्जेदार ध्वनी वैशिष्ट्यांसह सिस्का इयरग्रुव्हज युजर्सना संगीताचा अनोखा आनंद (एकंदरीत) १५ तासांसाठी देतात. इयरग्रुव्हजना चार्ज होण्यासाठी ४५ मिनिटांचा वेळ लागतो आणि चार्जिंग केसमध्ये चार्जिंगसाठी सहा ते सात तासांचा वेळ लागतो. (इनबिल्ट २००० एमएमएच पॉवरबँकमुळे, चार्जरच्या वापरावर अवलंबून*)

·         चार्जिंग केस – २००० एमएमएच चार्जिंग केसमध्ये इयरबड्स चार्ज करण्यासाठी चार पट जास्त उर्जा मिळत असल्यामुळे संकटाच्या वेळेस फोन चार्ज करण्यासाठी अतिरिक्त साधन म्हणून त्याचा वापर करता येऊ शकतो.

·         डिजिटल बॅटरी पर्सेंट डिस्प्ले – आकर्षकपणे डिझाइन करण्यात आलेल्या इयरग्रुव्ह्जमध्ये डिजिटल बॅटरी पर्सेंट डिस्प्ले देण्यात आला आहे.

·         कॉग्निझंट अ‍ॅक्टिव्ह टच सेन्सर – या वैशिष्ट्यामुळे युजरला कंट्रोल पॅनेलवर टच सेन्सरला स्वाइप आणि टॅप करून आवश्यक त्या गोष्टी करता येतात.

·         वन टॅप गुगल असिस्टंट – हे इयरग्रुव्हज गुगल असिस्टन्सशी सुसंगत आहेत.

सिस्का इयरग्रुव्हज आपला आवडता सिनेमा किंवा सीरीज पाहाण्यात रंगून जाणाऱ्यांना किंवा संगीत ऐकताना हरवून जाणाऱ्यांसाठी

अगदी योग्य आहे. हे इयरग्रुव्हज टाइप- सी केबल आणि उत्पादनातील त्रुटींसाठी १८० दिवसांच्या वॉरंटीसह येतात. इयरग्रुव्हज काळा व पांढरा अशा दोन रंगात आणि २४९९ रुपयांत उपलब्ध करण्यात आले आहेत. हे उत्पादन आघाडीच्या रिटेल दालनांमध्ये खरेदी करता येऊ शकते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...