अटल बस सेवेअंतर्गत हडपसर ते संकेत विहार (फुरसुंगी)नवीन बसमार्ग सुरू

Date:

पुणे- पीएमपीएमएल कडून अटल बस योजनेअंतर्गत मार्ग क्रमांक एच ११/१  हडपसर ते संकेत विहार (फुरसुंगी) हा नवीनबसमार्ग दि. २८ ऑगस्ट २०२१ पासून सुरू करण्यात आला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या बससेवेचे उदघाटन करण्यात आले. फुरसुंगीचे माजी उपसरपंच संजय हरपळे व माजी सरपंच सुधा संजय हरपळे यांच्या पाठपुराव्यातून ही बस सेवा सुरू झाली. सदरची बस सेवा अटल बस सेवेअंतर्गत असल्याने प्रवासी नागरिकांना फक्त पाच रुपये एवढ्या अत्यल्प व किफायतशीर दरात बस सेवा उपलब्ध होणार आहे.
यावेळी हरपळे तसेच पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक . दत्तात्रय झेंडे, नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे यांची प्रमुख
उपस्थिती होती. मार्ग क्रमांक एच ११ हडपसर ते संकेत विहार या बससेवेचा मार्ग हडपसर गाडीतळ, भाजी मंडई, काळे कॉलनी, गणेश विहार, समृद्धी हॉटेल, न्हावले वाडा, महादेव मंदिर, रेल्वे गेट, ड्रीम आकृती सोसायटी, ड्रीम रचना, ढेरे कंपनी, संकेत विहार असा असणार आहे. सध्या ही बस सेवा दर तासाला उपलब्ध असून प्रवासी संख्या व उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढवल्या जातील.
याप्रसंगी बोलताना महापौर मोहोळ म्हणाले, ” पीएमपीएमएल ने हा नवीन बस मार्ग सुरू केल्याने
संकेत विहार परिसरातील नागरिकांचा सार्वजनिक वाहतूक सेवेचा प्रश्न कायमचा दूर होणार आहे. पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी जिथे मागणी होईल तिथे तत्परतेने बससेवा सुरु केली आहे. त्याबद्दल पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो.”
सुधा हरपळे म्हणाल्या, ” संकेत विहार येथील सर्वसामान्य नागरीक स्वतःची खाजगी वाहने पार्किंगलालावून पीएमपीएमएलच्या बसचा जास्तीत जास्त वापर करतील व भरघोस प्रतिसाद देतील.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...

एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा नवी दिल्लीत‌ समारोप

18-19 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा...