मुंबई-INS विक्रांत घोटाळा प्रकरणी नील सोमय्यांचा अटकपुर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयाने आज फेटाळला आहे. INS विक्रांत घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने सोमवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. त्यानंतर आता नील सोमय्या यांचाही जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे दोघांनाही या प्रकरणी कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वाढली आहे. INSविक्रांत घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ट्राम्बे पोलिसांनी त्यांना समन्स बजावला होता पण सोमय्या तेव्हापासून नॉट रिचेबल आहेत. अटक टाळण्यासाठी सोमय्या पिता पुत्रांनी न्यायालयात धाव घेतली होती, पण एकापाठोपाठ दोघांचाही अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.
नील सोमय्या यांना दिलासा मिळण्याची शक्यता होती पण ती फोल ठरली. नील सोमय्यांनी कुठल्याही प्रकारचा दिलासा न्यायालयाकडून मिळाला नाही. विक्रांत बचाव निधी सोमय्या पिता-पुत्रांनी जनतेतून गोळा केला पण तो निधी योग्य कामासाठी वापरला गेला नाही, भाजपकडे तो जमा करण्यात आला. त्यामुळे जी सोमय्या पिता-पुत्रावर जबाबदारी होती ती ते झटकू शकत नाही. राज्य सरकार व मुंबई पोलिसांनी या प्रकरणात चौकशी करण्यासाठी सोमय्या पिता-पुत्रांना ताब्यात घेऊ शकतात.
INS विक्रांत या युद्धनौकेच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी जनतेकडून 56 कोटी गोळा केले. मात्र नंतर त्या पैशांचा स्वत:च्या निवडणुकीसाठी वापर केला आणि बरीच मोठी रक्कम मुलगा नील सोमय्या यांच्या कंपनीत टाकली, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. याप्रकरणी गुृरूवारी भाजपचे नेते किरीट सोमय्या, त्यांचे पुत्र नील सोमय्यांविरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निवृत्त लष्करी अधिकारी बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात सोमय्या पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

