पुणे – तुम्ही आता युवकांचे आदर्श, देशाचे संरक्षक बनला आहात. सेवा परमो धर्म: हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) ब्रीदवाक्य आहे. ते तुमच्या हृदयात कोरून ठेवा व आयुष्यात आणि देशसेवेसाठी त्याचा अवलंब करा, असा सल्ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी छात्रांना दिला.
‘एनडीए’ चा १३४ वा दीक्षान्त संचलन सोहळा राष्ट्रपती कोविंद यांच्या उपस्थित पार पडला. शिस्तबंध आणि दिमाखदार संचलन तसेच छात्रसैनिकांची मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांनी छात्रांना उद्देशून भाषण केले. प्रबोधिनीचे कमांडंट एअर मार्शल आयपी विपिन, डेप्युटी कमांडंट एस. के. ग्रेवाल, प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते.
– एनडीएचा १३४ व्या तुडकीचा शिस्तबद्ध दिमाखदार दीक्षांत सोहळा
तीन वर्षांचे यशस्वीपणे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण… देशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण… आणि येणा-या आव्हानाला सामोरे जाण्याचा त्यांच्या चेह-यावर झळकणारा आत्मविश्वास… अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३४ वा शिस्तबद्ध दीक्षांत सोहळा बुधवारी खेत्रपाल परेड ग्राऊंडवर दिमाखात पार पडला.
यावेळी अकॅडमी कॅडेट अक्षत राज याने सर्व शाखांमध्ये प्रथम येत राष्ट्रपतींच्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर छात्रसैनिक सोहेल इस्लाम याने सर्व शाखांमध्ये दुसरा येत रौप्य पदकाचा सन्मान मिळविला. अली अहमद चौधरी याने तिसरे स्थान पटकावत कांस्य पदक मिळविले. ‘किलो’ स्क्वॉड्रनला ‘चीफ आॅफ स्टाफ बॅनर’ पुरस्कार मिळाला. विजेत्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
संचलनात एकुण ३४४ कॅडेट सहभागी झाले होते. यातील २३८ छात्र लष्कराचे, २६ छात्र नौदलाचे आणि ८० छात्र हवाईदलातील होते. याशिवाय अफगाणिस्थान, भूतान , किरगीजस्थान, लाओस, नायजेरिया, मालदिव, तजाकीस्थान येथील १५ छात्रांचाही संचलन सोहळ्यात समावेश होता.
अक्षत राज हा छात्र सर्वोत्तम ठरला. राष्ट्रपतींच्या हस्ते त्याला सुवर्णपदक देण्यात आले. महंमद सोहेल इस्लाम याला रौप्य, तर अली अहमद चौधरी याला कांस्यपदक प्रदान करण्यात आले. ‘के’ ही स्क्वाड्रन सर्वोत्तम ठरली. त्यांना चिफ्स ऑफ स्टाफ बॅनर देण्यात आले.
सकाळी सात वाजता बिगुल वाजवून या सोहळ्यास सुरवात करण्यात आली. सव्वासातच्या सुमारास राष्ट्रपतींचे आगमन झाल्यानंतर चेतक हेलिकॉप्टरने त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी वाहनातून संचलनाची पाहणी केली. नंतर लष्कर आणि हवाईदलाच्या बॅंड वादनाच्या तालावर छात्रांबरोबर सुखोई विमानांनीही राष्ट्रपतींना मानवंदना दिली.
-सुखोई, मिराज विमानांनी दिली मानवंदना
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधितीतून बाहेर पडणा-या छात्रसैनिकांना भारतीय हवाई दलातील सर्वाधिक आधूनिक आणि वेगवान अशा ‘सुखोई ३०’, आणि ‘मिराज’ या विमानांनी थ्री फॉरमेशनमध्ये येत मानवंदना दिली. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
-लहाणपणापासून लष्करात येण्याची ईच्छा
माझे वडील हे लष्करातून सुभेदार म्हणून निवृत्त झाले आहे. यामुळे मी लहाणपनापासून लष्करी अधीकारी पाहत होतो. त्यामुळे लष्करात अधिकारी व्हायचे हे स्वप्न होते. सैनिक स्कूलमध्ये शिक्षण झाल्यामुळे मी ही परीक्षा पास होऊ शकलो. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनितील तीन वर्षांचे प्रशिक्षण खूप खडतर होते. यामुळे शारिरिक मानसिकरित्या आम्ही सक्षम झालो. मी माझ्या आई वडिलांचे आणि भावाचे खुप आभार मानतो. त्यांच्या पाठींब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे मी हे तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करू शकलो, अशी भावना आसाम येथील मुळ असलेला कांस्य पदक विजेता अली अहमद चौधरी याने व्यक्त केले.
-वडिलांचे स्वप्न केले पूर्ण
लहाणपणी इंजिनिअर व्हायचे होते. पण वडील लष्करात होते. मी सुद्धा लष्करात अधिकारी होवून त्यांची ईच्छा पूर्ण करावी अशी त्यांची ईच्छा होती. यामुळे मी सुद्धा लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला. एनडीएमध्ये येण्यासाठी मला त्यांचे मार्गदर्शन मिळाले. आई वडीलांचे प्रोत्साहान, एनडीएतील ड्रील प्रशिक्षक तसेच वर्गातील उत्साद यांच्या मार्गदर्शनामुळे मी माझे येथील तीन वर्ष यशस्वी पणे पुर्ण करू शकलो. आजच्या संचलन सोहळळ्याचे नेतृत्व करतांना खूप आनंद होत आहे. माझ्या आयुष्यातील हा महत्वाचा क्षण आहे. मी आर्मी कॅडेड असल्याने इंडीयन मिलीटरी अॅकडमीत जाणार असून त्यानंतर पायदळात दाखल होणार आहे, अशी भावना आसाम येथील मुळचा तसेच आजच्या संचलन सोहळ्याचे नेतृत्व करणारा रौप्य पदक विजेता सोहेल इस्लाम याने व्यक्त केली.
– राष्ट्रपदी सुवर्ण पदकाचा मानकरी ठरल्याने समाधानी
राष्ट्रपती सुवर्ण पदकाचा मानकरी ठरल्याने आज मला खूप समाधान मिळाले आहे. हे मी माझ्या आईवडीलांमुळे शक्य करू शकलो. त्यांनी मला या प्रतिष्ठीत संस्थेत येण्यास परवानगी दिली आणि मला नेहमी प्रोत्साहित केले. या ठिकाणी आल्यावर येथील प्रशिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. तीन वर्षात ऐकी, शिस्त आणि टीम स्पीरीट शिकलो. आर्मी कॅडेट असल्यामुळे भारतील लष्करात दाखल व्हायचे आहे, अशी भावना बिहार येथील चंपारण्य येथीलमुळ अससलेला तसेच राष्ट्रपती सुवर्ण पदकाचा मानकरी कॅडेट अक्षत राज यांनी व्यक्त केली.












