पुणे-दक्षिण पुण्यातील बोकाळलेल्या गुन्हेगारी विरोधात पुणे पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरु केलेली असताना आता यापुढे राष्ट्रीय तपास यंत्रणेतील चौकशीच्या फेऱ्याचे ग्रहण आता दक्षिण पुण्यातील राष्ट्रवादीच्या १/२ नेत्याना लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. दिवाळीपूर्वीच या कारवाईला सुरुवात होणार होती मात्र एका मंत्री असलेल्या महोदयांनी सबूरीचा सल्ला दिल्याची बातमी देखील सूत्रांकडून समजली आहे. पदाधिकारी राहिलेले दोघे आणि दक्षिण पुण्यात अनधिकृत बांधकामांचे जाळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पद्धतीने
उभारून राष्ट्रवादीचे काम करत राहिलेल्या बिल्डरचा यात नंबर लागण्याची शक्यता आहे. एक तर दक्षिण पुण्यात अनधिकृत बांधकामेच नाहीत तर बळकाविलेल्या शासकीय ,खाजगी जमिनी ,शासकीय कर्मचार्यांच्या वतीने केलेले फेरफार अशा बाबतीत संबंध असलेल्या १/२ जनांच्या चौकशीची तयारी करण्याचा प्रस्ताव तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त आहे . मात्र यावर अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे कदाचित राजकीय दृष्टीने याबाबत चाचणी होते की काय अशी शंका ही घेण्यात येते आहे .
एका मंत्र्याने मात्र अशा कारवाई पेक्षा हि मंडळी आपल्याकडे वळविण्यासाठी जोर दिल्याचे समजते .एक तर यांनाच पक्ष बदल करायला लाऊ अन्यथा त्यांच्या घरातील कोणी पक्ष बदल करेल अन्यथा त्यांच्याच पक्षात राहून ते आपल्याला मदत करतील अशा तीन शक्यतावर या मंत्र्यांचा प्रस्ताव असल्याच्चे समजते . राष्ट्रवादीचे नवे कार्यकर्ते अगर माजी नगरसेवक देखील आपल्याच पक्षातील या ‘टारगेटेड’ नेत्यांवर नाराज असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे . यातील दोघा नवीन नगरसेवकांना त्यांच्याच पक्षातून उमेदवारी पुन्हा देण्यात येणार नाही याबाबतची दक्षता ‘ ‘टारगेटेड’ नेते घेत असल्याचे समजते. दरम्यान खडकवासला,हडपसर असे दोन विधान सभा मतदार संघ येत असलेल्या या परिसरात येत्या महापालिका निवडणुकीपूर्वी बऱ्याच महत्वपूर्ण नसल्या तरी लक्षणीय घडामोडी घडू शकतील असे सूत्रांचे म्हणणे आहे.

