पुणे-भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलीची परवानगी नसेल तरी तिला पळवून नेण्याचे आक्षेपार्ह विधान दहिहंडीच्या उत्सवात केले. हे अत्यंत निषेधार्ह विधान असून जमावापुढे असे वक्तव्य करणे चुकीचे आणि संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ,विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी दिली आहे.
पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने लाल महल येथे राजमाता जिजाबाईंना पुष्पहार अर्पण करण्यात आला. वत्यानंतर लाल महाल चौकात आमदार राम कदम याच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले व काळे फासण्यात आले . ऱाम कदम चे कारायचे काय … खाली डोके वर पाय , भाजप सराकारच धिक्कार असो , राम कदम जोडे मारा बेदम अशा घोषणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी परीसर दणाणून सोडला . यावेळी मा. महापौर दताभाउ धनकवडे, रविंद्र आण्णा माळवदकर , नगरसेवक अशोक कांबळे,वनराज आंदेकर, नंदा लोणकर, अश्विनी भागवत ,लक्ष्मी दुधाणे ,परवीन फिरोज शेख,युवक अध्यक्ष राकेश कामठे , युवती मनाली भिलारे,वासंती काकडे, शांतिलाल मिसाळ, डॉ.दत्तात्रय गायकवाड, प्रदिप देशमुख,रजनी पाचंगे, सुहास उभे , अजय दराडे , उर्मिला गायकवाड,फहिम शेख, अजिम गुडाकुवाला, मेहबुब शेख , राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


