पुणे- पेशवाई चे प्रतिक मानल्या जाणाऱ्या पुणेरी पगडीला या पुढे कायमची तिलांजली देण्याची सक्त ताकीद देत, पुरोगाम्यांना आणि एल्गार परिषद भरविणाऱ्यांना नक्षली ठरवता ,त्यांना गुन्हेगार बनविता , नेपाळ मधून भारतातल्या जुन्या नोटा बदलून देण्याचा धंदा मांडता ,महागाई ,आत्महत्या तर विचारू नका पण त्याकडे दुर्लक्ष करून परदेश दौरे ठोकता ,मशीन च्या आधारे निवडणुका लढविता ? ‘उधळलेल्या खोंडावर ‘ओढावेत असे जोरदार आसूड आज खुद्द शरद पवार यांनी भाजपवर ओढले.पीएम आणि सीएम यांच्या नावांचा उल्लेख न करता धमक्यांच्या पात्रांची खिल्ली उडवून हा अविशासार्ह आणि सहानुभूती मिळवू पाहणारा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले . सत्ता येते आणि जाते ..पण अशी मस्ती बरी नाही असे त्यांनी सांगितले आणि भाषणाच्या प्रारंभी पुणेरी पगडी चा आता त्याग करा असा आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला ….
राष्ट्रवादी काँग्रेसचा २० वा स्थापना दिन व पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा पुण्यात सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल येथे आयोजित केली होता. यावेळी पवार बोलत होते. सभेसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, चित्रा वाघ, हसन मुश्रिफ , दिलीप वळसे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, फौजिया खान, आण्णा डांगे, वंदना चव्हाण ,जयदेव गायकवाड,अंकुश काकडे,प्रशांत जगताप ,विशाल तांबे,अश्विनी कदम, इक्बाल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
पहा आणि ऐका पवार यांच्या भाषणातील ठळक मुद्दे …..