पुणे-पुणे कुणाचे ? बहुजनांचे कि मुठभरांचे? याचा निर्णय या महापालिका निवडणुकीत पुण्यातील मतदारांनी करायचा आहे असे आवाहान आज येथे राष्ट्रवादीचे नेते ,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले .
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचाराचा शुभारंभ झाला. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. प्रचार सभा अण्णा भाऊ साठे पुतळा, सारसबाग येथे आज सोमवारी सायंकाळी झाली . यावेळी खा. वंदना चव्हाण, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, प्रशांत जगताप, बाळासाहेब बोडके , वैशाली बनकर, अनेक पदाधिकारी, विविध सेल अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी पहा आणि ऐका अजितदादा नेमके काय म्हणाले …