पुणे :’उत्तर प्रदेश निवडणूक पार्श्वभूमीवर राममंदिर बांधण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देणे म्हणजे निवडणुकीपुरता राम मंदिराचा मुद्दा बाहेर काढून समाजात तेढ वाढवून मतांची पोळी शेकणे होय’अशी टीका पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि शहर प्रवक्ते अशोक राठी यांनी शनिवारी सायंकाळी केली केवळ मतांसाठी दोन समाजात तेढ निर्माण करून आजपर्यंत भाजपने राम मंदिर हा मुद्दा वापरला,आणि उत्तर प्रदेश निवडणूक जाहीरनाम्यात पुन्हा हे आश्वासन देऊन अमित शहा मतांची पोळी शिकण्याच्या प्रयत्नात आहेत, ही अत्यंत घृणास्पद बाब आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणे,मशीद पाडणे आणि धार्मिक मुद्दे निवडणुकीसाठी वापरणे हा चुकीचा मार्ग भाजप पुन्हा पुन्हा वापरत आहे, हेच संविधानासाठी धोक्याचे आहे तरीही संवैधानिक मार्गाने मंदिर बांधू’असे अमित शहा यांचे आश्वासन अत्यंत चुकीचे आहे’ असे अशोक राठी यांनी म्हटले आहे