हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये साने गुरुजी प्रशाला येथे झालेल्या कार्यशाळेत दोनशे हजारी प्रमुखांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
पुणे शहर हजारी प्रमुख व्यवस्थेच्या समन्वयक शिल्पा भोसले , पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अशोक राठी, ऍड. म. वि. अकोलकर, शंकर शिंदे यांनी हजारी प्रमुखांना मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष, खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शन खाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हडपसर विधासभा मतदारसंघाचे अध्यक्ष मंगेश तुपे, प्रदेश उपाध्यक्ष राजलक्ष्मी भोसले, विनायक चाचर, नगरसेवक चेतन तुपे, नंदा लोणकर, वैशाली बनकर, चंचला कोद्रे, विजया कापरे, अनिस सुंडके, निलेश मगर, रईस सुंडके, कलेश्वर घुले, फारुकभाई इमानदार, शंतनू जगदाळे, योगेश ससाणे, सागर भोसले, प्रशांत पवार यांच्या हस्ते हजारी प्रमुखांना नियुक्ती पत्रे, ओळख पत्रे देण्यात आली यावेळी हजारी प्रमुख व्यवस्थेतील कार्यकर्ते उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रदीप मगर, विक्रम जाधव यांनी केले .
यावेळी खासदार आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांचा संदेश हजारी प्रमुखांना वाचून दाखविण्यात आला. ‘हजारी प्रमुखांनी प्रभागात सुसंवाद ठेवावा. दैनंदिन संवादातून आत्मविश्वास ,नम्रतेने आणि संयमपूर्वक ‘बूथ लेव्हल’ चे कार्य अचूक करावे. विजय हेच अंतिम लक्ष्य असून ते निश्चित गाठावे ‘ असे त्यांनी या संदेशात म्हटले आहे.