नीलेश नवलाखा आणि श्याम मानकर यांचा अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
पुणे :
नीलेश नवलाखा (अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपट निर्माते व मनसेचे माजी उमेदवार) आणि श्याम मानकर (माजी नगरसेवक आणि अखिल हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आज निसर्ग मंगल कार्यालय येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष खासदार अॅड.वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, पक्षाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
नीलेश नवलाखा (महाराष्ट्र नव निर्माण सेना), श्याम मानकर (काँग्रेस), श्याम ससाणे (भाजप), संदीप शिंदे (मनसे), संदीप करपे (मनसे), संतोष हराळे (काँग्रेस), हुजूर इनामदार (भाजप), सचिन कवडे (मनसे), सचिन कुंभार (मनसे), तृती करपे (मनसे), अनुराधा गुरव (काँग्रेस), बंडू जायभाय (भाजप), जयश्री पाटोळे (भाजप), विजया कांबळे (सामाजिक कार्यकर्ते), रमेश सोनवणे (आर पी आय), शोभा सोनवणे (आर पी आय), छाया सोनवणे (आर पी आय), सुनील अवघडे (मातंग एकता आंदोलन), मालू कसबे (मातंग एकता आंदोलन), किरण सोनवणे (युवा सेना), देविदास बनसाडे (भाजप), मनोहर डाबी (भाजप), मोजस फासगे (भाजप), लाजरस जगधाने (भाजप), राजेंद्र दनाने (भाजप), सुरेश दोडके (भाजप), संदीप कडू (भाजप), वेैजयंती फाटे (भाजप) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.